(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्तांच्या खात्यावर 75 टक्केच रक्कम जमा, शेतकऱ्यांची दिवाळी गोड कशी होणार?
राज्य सरकारनं अतिवृष्टीग्रस्तांना साठी जाहीर केलेल्या मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. राज्य सरकारनं प्रति हेक्टरी दहा हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती. परंतु तेवढी मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होताना जास्त नाही. दिवाळी आधी शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीच्या 75% मदत जन्मी जमा करण्याचे सरकारने ठरवले आहे.
आज उस्मानाबाद तालुक्यातल्या कळंब तालुक्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झालेत. मराठवाड्यातल्या इतर जिल्ह्यातही मदत पोहोचायला सुरुवात झालेली आहे. परंतु अजूनही काही जिल्ह्यांमध्ये बँक खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. आज जमा झालेल्या मदतीमध्ये प्रति एकरी सुमारे चौदाशे रुपये बँक खात्यावरती जमा झालेले दिसून येत आहेत. राज्य सरकारनं एनडीआरएफच्या मदती पेक्षा हि आम्ही अधिक मदत देऊ असं घोषित केलं होतं. प्रति हेक्टरी 10 हजार रुपयाची मदत घोषित केली असली तरी आज बँक खात्यावरती जमा झालेली मदत अतिशय कमी आहे. तरीही दिवाळीआधी तुटपुंजी का असेना बँक खात्यावर किती पैसे जमा होत आहेत.