(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP Majha Headlines : 01 PM : 20 October 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महाविकास आघाडीतली तणातणी कायम, उद्धव ठाकरेंनी बोलावली तातडीची बैठक, स्बबळावर लढण्याचा नारा देणार की काँग्रेसवर दबावाचं तंत्र..
महाविकास आघाडीमध्ये नाट्यमय घडामोडींना वेग... आदित्य ठाकरे शरद पवारांच्या भेटीला
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीची आज पुन्हा बैठक, काल ५८ नावं फायनल, आणखी २६ नावांवर होणार चर्चा...
नाना पटोले, विजय वडेट्टीवारांसह थोरातांची आज दिल्लीवारी... जागावाटपासंदर्भात दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची चर्चा होण्याची शक्यता
महाविकास आघाडीची जवळपास सर्व जागांवर चर्चा पुर्ण ...आज किंवा उद्या यादी जाहीर होण्याची शक्यता
आमचा घात केला, आता सुट्टी नाही, मनोजर जरांगेंचा पुन्हा इशारा, अंतरवाली सराटीत महत्वाची बैठक, सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढायचं की पाडायचं, हा भूमिका करणार स्पष्ट
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या एका गटाकडून नवनीत राणांचं नाव पुढे... पक्ष श्रेष्ठींनी होकार दर्शवल्यास रवींद्र चव्हाण आणि इम्तियाज जलील यांचं असणार आव्हान..