एक्स्प्लोर

Suresh Dhas : संतोष देशमुख प्रकरणात शेवटपर्यंत लढणारच, टीकेची झोड उठल्यानंतर सुरेश धस स्पष्टच बोलले, म्हणाले, ज्यांनी षडयंत्र रचलं, त्यांचा...

Suresh Dhas : सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात गुप्त झाल्याची माहिती समोर आल्यानंतर विरोधकांनी सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

Suresh Dhas : संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर (Santosh Deshmukh Murder Case) भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांना लक्ष्य केले होते. मात्र, सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांच्यात गुप्त झाल्याची माहिती समोर आली. यानंतर विरोधकांनी सुरेश धस यांच्यावर निशाणा साधला. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी वाल्मिक कराड (Walmik Karad), सुरेश धस आणि धनंजय मुंडे हे एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला आणि व्यापार केला, अशी टीका सुरेश धस यांच्यावर केलीय. आता टीकेची झोड उठल्यानंतर सुरेश धस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

संजय राऊत आंतरराष्ट्रीय पातळीवरचे प्रवक्ते आहेत. त्यांच्यावर माझ्यासारख्या माणसाने बोलले उचित ठरणार नाही, असा टोला सुरेश धस यांनी संजय राऊत यांना लगावलाय. एखाद्या माणसाच्या अंगात इतका वेगळेपणा असू शकतो हे पहिल्यांदा पाहायला मिळालं. क्रूर हत्या झाली, याचं यांना काही वाटलं नाही. एखादं पद देतील किंवा लाभ होईल म्हणून तुम्ही भेटता हे चुकीचं आहे. या गुप्त भेटीची माहिती ज्याने बाहेर आणली त्याला मार्क दिले पाहिजे. त्याच व्यक्तीने खऱ्या अर्थाने मराठा समाज जागा केला आहे, अशी टीका मनोज जरांगे यांनी केली होती. याबाबत विचारले असता मनोज जरांगे पाटील जरी काही बोलले असतील तरी आता एक दोन गोष्टी पुढे येत आहेत. त्यांचाही गैरसमज दूर होईल, असे सुरेश धस यांनी म्हटले आहे. 

शेवटपर्यंत लढा मी देणारच 

ते पुढे म्हणाले की, धनंजय देशमुख आणि मस्साजोगचे नागरिक माझ्यासोबत आहेत. मनोज जरांगे पाटील यांची सुद्धा भूमिका माझ्यासोबतच राहील. हे पेल्यामधले वादळ आहे. एक दोन दिवसांमध्ये शांत होऊन जाईल. आमच्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आजही सांगितले की, सुरेश धस त्यांच्या म्हणण्यावर ठाम राहिले आहेत. मी आजही ठाम आहे, उद्याही राहील आणि जोपर्यंत या आरोपींना फाशी होणार नाही तोपर्यंत मी ठाम राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. जर कुणाच्या मनाला ठोस पोहोचले असेल तर ती काढून टाका, या प्रकरणात शेवटपर्यंत लढा मी देणारच आहे, असे त्यांनी म्हटले. 

ज्यांनी षडयंत्र रचलं, त्यांचा मी बंदोबस्त करणार

धनंजय मुंडे यांची मी घेतलेली भेट आणि बावनकुळे साहेबांकडे मी जेवणासाठी गेलो ती भेट या दोन्ही एकत्र सांगण्यात आल्या. कुणीतरी अतिशय व्यवस्थितपणे यामध्ये षडयंत्र रचले आहे. हे सगळं षडयंत्र मी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे. ज्यांनी षडयंत्र रचले आहे त्यांचा मी बंदोबस्त करणार आहे. धनंजय मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना भेटायला पाहिजे होते. पंकजाताईंनी भेटायला पाहिजे होते. मात्र, दोघेही भेटले नाहीत. त्यावर चर्चा झाली नाही. बावनकुळे साहेबांनी आमची भेट झाल्याचे सांगितले त्याची मात्र चर्चा झाली. मी फक्त टीव्हीवर बोलत नाही तर कायदेशीर सुद्धा चौकशी करून तक्रारी करतो. हे सगळं षडयंत्र आहे. संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी हा डाव रचला जातोय, असा आरोप त्यांनी केलाय. 

आणखी वाचा 

Karuna Sharma: सुरेश धस- धनंजय मुंडेंची 'मांडवली' झाल्याची चर्चा, पण करुणा शर्मांनी वेळ हेरली, म्हणाल्या, ब्रह्मास्त्र बाहेर काढण्याची वेळ आलेय!

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada Mastermind : कोण आहे नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड? ते अकाउंट कोणाचं?Yujvendra Chahal Divorced : युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा अखेर घटस्फोट, फॅमिली कोर्टाकडून मंजूरीZero Hour : दिशा सालियनच्या कुटुंबावर दबाव?  आदित्य ठाकरे अडचणीत येणार?Special Report on Aaditya Thackeray : दिशाच्या वडिलांची याचिका, आदित्य ठाकरे अडचणीत येणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
Embed widget