(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kasba Chinchwad Bypoll Election : पुण्यातला प्रचार थंडावला; कसबा-चिंचवडचा फ्लॅशबॅक Special Report
पुण्यातील कसबा आणि चिंचवडमध्ये प्रचाराचा लाऊडस्पीकर बंद झालाय. पोटनिवडणूक प्रचाराच्या तोफा आता थडावल्या असून त्याआधी रोड शो करुन, सभा घेऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय नेत्यांकडून केला गेलाय... सर्वच पक्षांनी ताकदीनिशी प्रचार सभा, बाईक रॅली आणि पदयात्रेवर भर दिलाय... मुख्यमंत्री शिंदेंचा कसब्याचे भाजप उमेदवार हेमंत रासनेंसाठी रोड शो पार पडला तर, महाविकास आघाडीने काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्यासाठी जोरदार प्रचार केलाय. तिकडे चिंचवडमध्ये अश्विनी जगताप आणि नाना काटे यांच्यासाठी भाजप तसंच महाविकास आघाडीनं प्रचाराचा जोर लावला. शिवाय बंडखोर राहुल कलाटे यांनीही प्रचाराचं जोरदार रणशिंग फुंकलं. या पोटनिवडणुकीसाठी 26 फेब्रुवारीला मतदान होणार आहे तर 2 मार्चला मतमोजणी आहे. दरम्यान, प्रचाराची मुदत संपल्यामुळे सर्वच पक्षाचे कार्यकर्ते वैयक्तिक भेटीगाठींवर भर देणार आहेत.