Suresh Dhas Dhananjay Munde Meet : बॉसचा ट्रॅप, संशय-आरोपांचा रॅप Rajkiya Sholay Special Report
सरपंच हत्या प्रकरणात आरोपींच्या पिंजऱ्यात उभं केलं जाणाऱ्यांची आणि आरोप करणाऱ्यांची यादी ठरलेली आहे... फक्त आरोपांचं स्वरूप आणि तीव्रता दररोज बदलत जाते.. आजचा दिवसही त्याला अपवाद नाही ठरला.. प्रश्न एवढाच आहे की दररोज नवनवीन राजकीय आरोप प्रत्यारोप होतात... मात्र राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या गर्दीत मूळ प्रश्न हरवत चाललाय का?
संतोष देशमुख हत्येनंतर, रोजचा सूर्य नवीन आरोपांसह उगवतोय..
आधीच देशमुख कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे बीड पोलीस संशयाच्या गर्तेत सापडलेत..
अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी, चार्जशीटमध्येच छेडछाड झाल्याचा आरोप केलाय..
हा संशय व्यक्त करताना त्यांनी बोट ठेवलंय धस आणि मुंडेंच्या गपचूप झालेल्या भेटीवर
आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीमुळे टीकेची झोड उठवण्याची आयती संधी विरोधकांना मिळालीय..
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनीच धसांसाठी ट्रॅप लावला होता... असा संशय व्यक्त करताना मोठी डील झाल्याचा दावा राऊतांनी केलाय.
All Shows

































