Dhananjay Munde : वादाला GR, मुंडे बेजार;सावरण्यासाठी सदावर्ते मैदानात Rajkiya Sholay Special Report
धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आणखी वाढली...कथित कृषी घोटाळ्या विरोधात अंजली दमानिया यांनी उभारलेल्या आघाडीत विजय कुंभार या नव्या नावाची भर पडली.. तर सुरेश धसांसारख्या जुन्या शिलेदारांनीही आरोपांची धार आणखी तेज केलीय. ३०० कोटींचा घोटाळा असल्याचं सांगत धसांनी पहिल्यांदाच मुंडेंच्या राजीनाम्याची मागणीही केलीय. गंभीर आरोपांसोबतच गंभीर आजाराचं आव्हान सुद्धा धनंजय मुंडेंसमोर उभं राहिलंय. पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट
दमानिया म्हणतात ते पत्र सचिवांनी तयार केलेलं टिपण आहे,
त्यावर तारीख टाकायची पद्धत नाही, असा दावा त्यात करण्यात आलाय.
कृषी विभागाच्या खरेदी आणि थेट पुरवठ्याला मान्यता
३० सप्टेंबर २०२४ ला मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली...
त्यानंतर मुख्य सचिवांकडून २३ सप्टेंबर २०२४ च्या मंत्रिमंडळ बैठकीचं इतिवृत्त जारी केलं असं स्पष्टीकरणात म्हटलंय...
All Shows
































