एक्स्प्लोर

प्लास्टिकच्या झाडूमध्ये लपवून तब्बल 10 कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी; दादरच्या गेस्ट हाऊसवर छापा, दोघांसह 5 किलो एमडी ड्रग्ज जप्त

मुंबईच्या दादर येथून अमली पदार्थांच्या तस्करी बाबत मोठी बातमी समोर आली आहे. यात प्लास्टिकच्या झाडूमध्ये लपवून तब्बल 10 कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करीचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे.

Mumbai Drugs Smuggling Case : मुंबईच्या दादर येथून अमली पदार्थांच्या तस्करी बाबत मोठी बातमी समोर आली आहे. यात प्लास्टिकच्या झाडूमध्ये लपवून तब्बल 10 कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करीचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे. 'एबीपी माझा'च्या  हाती या संबंधित व्हिडिओ  हाती लागला असून ज्यामध्ये ड्रग्ज तस्कर प्लास्टिकच्या झाडूमध्ये ड्रग्जची तस्करी करत असल्याचे दिसत आहे.

तब्बल 5 किलो 40 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना या बाबत मिळालेल्या माहितीच्या आधारे, गुन्हे शाखा युनिट 9ने दादर स्थानकाजवळील एका गेस्ट हाऊसवर छापा टाकून कारवाई केली. तसेच या गेस्ट हाऊसवरुन दोघांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून तब्बल 5 किलो 40 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या ड्रग्जची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत ही 10 कोटी 8 लाख रुपये आहे. तर जहांगीर शेख आणि सेनुअल शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून यात आणखी मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता बळावली आहे.

प्लास्टिकच्या झाडूंचा वापर करून अनेकदा ड्रग्जची तस्करी

दुसरीकडे, तपासादरम्यान जहांगीर नावाच्या आरोपीने अनेक प्लास्टिकच्या झाडूंचा वापर करून अमली पदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेल्याचे उघड झाले आहे. यानंतर आरोपी जहांगीरने दुसऱ्या आरोपी सेन्युअलच्या घरी हे ड्रग्ज भरलेले झाडू लपवून ठेवले होते. पोलिसांच्या पथकाने तेथे पोहोचून पंचनामा करून प्लास्टिक झाडू जप्त केला. सध्या पोलिसांचे पथक त्यांना ड्रग्ज पुरवणाऱ्या व्यक्तीच्या मागावर आहे. या प्रकरणी माटुंगा पोलिस ठाण्यात एनडीपीएसच्या कलम 8(सी) आर/डब्ल्यू 22(सी), 29 अन्वये एफआयआर नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. 

दुमजली घर अंगावर कोसळून 12 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी

कुरल्यात एक निर्माणाधीन दुमजली घर अंगावर कोसळून 12 वर्षीय विद्यार्थिनी गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. अनिशा रामचंद्र इपिली असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. कुर्ला येथील कुर्ला गाव पीटर परेरा रोड वर ही घटना घडली आहे. सदर विद्यार्थिनी तिच्या आजीसोबत क्लासला जाण्यास निघाली होती. या वेळी त्या दोघी रस्त्यावरील वंदना ठक्कर यांच्या 83 क्रमांकाच्या घराजवळ आल्या असता या घराच्या डागडुजीचे काम सुरू होते. तो वरील मजलाच त्यांच्या अंगावर कोसळला. यात अनिशा गंभीर जखमी झाली. तर तिला स्थानिकांनी क्रीटीकेयर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून तिची स्थिती नाजूक आहे. ही घटना या रस्त्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या प्रकरणी विनोबा भावेनगर पोलीस ठाण्यात घरमालक वंदना मथुरादास ठक्कर आणि कंत्राटदार ऑस्टिन न्यूनिस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिशाच्या कुटुंबाची स्थिती प्रचंड हलाखीची असल्याने आणि त्यात अशी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

व्हिडीओ

Special Report Manoj Jarange On Protest : जरांगेंचा पुन्हा एल्गार,आंदोलनाआधी सरकारच्या हालचाली सुरु?
Special Report Pune Kalakar Katta : पुण्यातला कलाकार कट्टा हटवणार?; भाजपच्या नगरसेवकांची मागणी
Special Report MVA : मविआची मैत्री सेट तरच 'रेड कार्पेट'; Uddhav Thackeray विधान परिषदेवर जाणार?
Narhari Zirwal Special Report झिरवळांच्या कार्यालयात क्लार्कला 35 हजारांची लाच स्विकारताना अटक
NCP Merge Special Report शशिकांत शिंदेंच्या लेखामध्ये काय?,राष्ट्रवादीचं विलिनीकरण कुठे अडलं?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
भारतातील टॉप 10 सर्वात श्रीमंत शहरे, मुंबईचा पहिला नंबर; पुणेकर कितव्या स्थानी?
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
एअर इंडिया संकटात, सुरक्षा प्रमाणपत्राशिवाय विमानाचं उड्डाण करण भोवलं, DGCA नं ठोठावला 1 कोटींचा दंड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
डंपरच्या धडकेत भाजीपाला घेऊन जाणाऱ्या वृद्धाचा मृत्यू, मोबाईलवर बोलत होता चालक, जमावाकडून तोडफोड
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
तीन दिवसांपासून बेपत्ता अन् वर्गमित्राच्या खोलीत MBA विद्यार्थीनीचा निर्वस्त्र मृतदेह सापडला; कॉलेजच्या ग्रुपमध्ये आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल
IND vs PAK : पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, नामिबियाच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानं सुनील गावस्कर नाराज,  'या' खेळाडूचं नाव सूचवलं 
पाकिस्तान विरुद्ध अर्शदीप सिंगला खेळवू नका, सुनील गावस्कर यांचा सूर्यकुमार यादवला सल्ला, कोणाचं नाव सूचवलं?
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! रोहित पवारांची मागणी, केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
Embed widget