Tata EV घेणाऱ्यांची होणार चांदी, कंपनीने 45 दिवसांसाठी आणली बंपर ऑफर, जाणून घ्या सविस्तर
Tata EV : टाटा ईव्हीने 2 लाख इलेक्ट्रिक कार विकण्याचा टप्पा पार केला आहे. यानिमित्त टाटा कंपनी पुढील 45 दिवसांसाठी ग्राहकांना विशेष ऑफर देत आहे.

मुंबई : टाटा ईव्हीने (Tata EV) 2 लाख इलेक्ट्रिक कार (Electric car) विकण्याचा टप्पा पार केला आहे. यानिमित्त टाटा कंपनी पुढील 45 दिवसांसाठी ग्राहकांना विशेष ऑफर (Special offers) आणि डिस्काउंट (Discount) देत आहे. तसेच, जे लोक आधीच टाटा कार वापरतात त्यांना देखील नवीन ईव्हीमध्ये अपग्रेड करण्याची संधी कंपनीने उपलब्ध करून दिली आहे.
टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक कारने 5 वर्षात तब्बल 5 अब्ज किलोमीटरहून अधिक प्रवास करून CO2 उत्सर्जन कमी करण्यात मोठं योगदान दिले आहे. टाटा ईव्ही भारतीय बाजारात ईव्ही टेक्नॉलजी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने काम करत आहे. यासाठी कंपनीने चार्जिंग सुविधांवरही मोठी गुंतवणूक केली आहे. कंपनीने अलीकडेच 2027 पर्यंत 400,000 पेक्षा जास्त चार्जिंग पॉईंट्स इंस्टॉल करून भारतातील सार्वजनिक चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर दुपटीने वाढवण्याचे प्रयत्न करत असल्याची घोषणा केली आहे.
टाटा ईव्हीने 2 लाख इलेक्ट्रिक कार विकण्याचा टप्पा गाठल्यानंतर 45 दिवसांच्या सेलिब्रेशनचा एक भाग म्हणून ग्राहकांना विशेष ऑफर दिल्या आहेत. यात एक्स्चेंज बोनस, जीवनभर बॅटरी वॉरंटी आणि 100 टक्के ऑन-रोड़ फायनॅन्सचे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच Tata Power चार्जिंग स्टेशनवर 6 महीने मोफत चार्जिंगचा करण्यात येणार आहे. ईव्ही खरेदी केल्यावर, 7.2 किलोवॅट एसी फास्ट होम चार्जर फ्रीमध्ये उपलब्ध होईल. 50 हजार रुपयांपर्यंतचा लॉयल्टी बोनस देखील टाटा ईव्हीकडून देण्यात येणार आहे. हा बोनस टाटा मोटर्सच्या इलेक्ट्रिक वाहन मालकांसाठी आहे जे त्यांची जुनी कार नवीन ईव्हीने बदलू इच्छितात. त्यामुळे टाटाची ईव्ही कार घेणाऱ्या ग्राहकांसाठी ही सुवर्णसंधी आहे.
नवीन ग्राहकांसाठी या आहेत खास ऑफर्स
- EV च्या पहिल्या खरेदीवर बॅटरीची जीवनभर वॉरंटी. 160,000 किमीपर्यंत मर्यादित.
- 100 टक्के ऑन-रोड फायनॅन्स मिळावा यासाठी शून्य डाऊन पेमेंटची सोय.
- Tata Power सोबत 6 महिन्यांपर्यंत मोफत चार्जिंगचा लाभ.
- EV च्या खरेदीसोबत 7.2 kW AC फास्ट होम चार्जर आणि त्याचे विनामूल्य इन्स्टॉलेशन.
- Nexon.ev आणि Curvv.ev च्या खरेदीवर 50,000 रु. चा लॉयल्टी बोनस.
- Nexon.ev आणि Curvv.ev च्या खरेदीवर 20,000 रु. चा लॉयल्टी बोनस.
इतर महत्त्वाच्या बातम्या























