अदानींसाठी 2025 निराशाजनक! 2 महिन्यात 1.04 लाख कोटींचा फटका, अदानींची एकूण संपत्ती किती?
उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी आत्तापर्यंत 2025 हे वर्ष निराशाजनक गेले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सचा एक अहवाल (Bloomberg Billionaires Index report) समोर आला आहे.

Gautam Adani : देशातील दिग्गज उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्यासाठी आत्तापर्यंत 2025 हे वर्ष निराशाजनक गेले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सचा एक अहवाल (Bloomberg Billionaires Index report) समोर आला आहे. या अहवालात 2025 मध्ये जगातील सर्वाधिक संपत्ती गमावलेल्या लोकांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अदानी एंटरप्रायझेसमध्ये या वर्षी 14.7 टक्के घसरण झाली आहे, तर अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये 8.85 टक्के घसरण झाली आहे. याच कालावधीत अदानी पॉवर आणि अदानी ग्रीन एनर्जीसह इतर समूह कंपन्यांमध्ये अनुक्रमे 8.15 टक्के आणि 17.3 टक्क्यांची घसरण झाली आहे.
गौतम अदानी सध्या जगातील 23 व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या अहवालानुसार, गौतम अदानी सध्या जगातील 23 व्या सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. 2025 मध्ये जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान गौतम अदानी यांच्या संपत्तीत 1.04 लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. जी जगभरातील अब्जाधीशांच्या संपत्तीमध्ये दुसरी सर्वात मोठी घट आहे.
एलन मस्क यांच्या संपत्तीत सर्वाधिक घट
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या अहवालानुसार 2025 मध्ये जगभरात कोणाला सर्वाधिक नुकसान झाले असेल तर ते एलन मस्कला. या अहवालानुसार गेल्या दोन महिन्यांत एलन मस्कच्या संपत्तीत 35.2 अब्ज अमेरिकन डॉलरची घट झाली आहे.
गौतम अदानी यांची एकूण संपत्ती किती?
2025 मध्ये गौतम अदानी यांच्या संपत्तीत 1.04 लाख कोटी रुपयांची ($11.9 अब्ज) घट झाली आहे. यानंतर त्यांची एकूण संपत्ती 5 लाख 79 हजार कोटी रुपये झाली आहे. दुसरीकडे, एलन मस्कच्या संपत्तीत $35.2 अब्जची घट झाली असून, त्यांची एकूण संपत्ती $397.3 अब्ज झाली आहे.
अदानी कंपनीचे शेअर्समध्येही घसरण
अदानी एंटरप्रायझेसमध्ये या वर्षी 14.7 टक्के घसरण झाली आहे, तर अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये 8.85 टक्के घसरण झाली आहे. याच कालावधीत अदानी पॉवर आणि अदानी ग्रीन एनर्जीसह इतर समूह कंपन्यांमध्ये अनुक्रमे 8.15 टक्के आणि 17.3 टक्क्यांची घसरण झाली आहे.
मुकेश अंबानी यांचेही नुकसान
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या अहवालानुसार, 2025 मध्ये मुकेश अंबानी यांच्या संपत्तीतही घट झाली आहे. संपत्ती 25 हजार कोटी रुपयांनी घटून 7.61 लाख कोटी रुपयांवर आली आहे. त्याच वेळी, एचसीएल टेकच्या शिव नाडरची एकूण संपत्ती 39 हजार कोटी रुपयांनी घटून 3.35 लाख कोटी रुपयांवर आली आहे.
महत्वाच्या बातम्या:
Gautam Adani : प्रत्येक आव्हान आम्हाला मजबूत बनवते; अमेरिकेतील आरोपांवर गौतम अदानी पहिल्यांदाच बोलले


















