एक्स्प्लोर

Shweta Mahale : 'आम्ही बकरे कापणारे', भाजपच्या महिला आमदाराला जीवे मारण्याची धमकी; हिंदी-मराठी पत्रात नेमकं काय लिहलंय?

Shweta Mahale Death Threat: आलेल्या पत्रामध्ये आमदार श्वेता महाले यांच्या बद्दल अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. नेमकी किती पत्र आहेत आणि त्यामध्ये काय लिहलंय ते खुद्द आमदार श्वेता महाले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

बुलढाणा: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर आता आणखी एका महिला आमदाराला जीवे मारण्याच्या धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. बुलढण्यातील चिखलीच्या भाजपा आमदार श्वेता महाले (Shweta Mahale) यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. श्वेता महाले यांच्या चिखली येथील निवासस्थानी हे धमकीचं पत्र मिळालं आहे. आमदार श्वेता महाले यांच्या चिखली येथील निवासस्थानी धमकीच पत्र पाठवण्यात आलं होतं. आज (शुक्रवारी) दुपारी आमदार श्वेता महाले यांनी आपल्या समर्थकांसह चिखली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आलेल्या पत्रामध्ये आमदार श्वेता महाले यांच्या बद्दल अतिशय आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आली आहे. नेमकी किती पत्र आहेत आणि त्यामध्ये काय लिहलंय ते खुद्द आमदार श्वेता महाले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे. मिळालेल्या पत्रामध्ये तुला जिवे मारून टाकू, तुझे तुकडे तुकडे करू, इंदिरा गांधी यांना सुद्धा सुरक्षा होती, असा उल्लेख या पत्रात नमूद असल्याचं खुद्द श्वेता महालेंनी सांगितलं आहे. 

नेमक्या काय म्हणाल्यात श्वेता महाले?

याप्रकरणी माध्यमांना माहिती देताना श्वेता महाले म्हणाल्या, काल माझ्या कार्यालयामध्ये मी निनावी पत्र आलं. एका लिफाफ्यामध्ये तीन धमक्या देणारी पत्र होती. त्या पत्रामध्ये जीवे मारण्याचा उल्लेख करण्यात आलेला होता. एका विशिष्ट समाजाचा उल्लेख देखील त्या पत्रामध्ये केला आहे आणि त्या समाजाकडून मला मारण्याची धमकी देण्यात आली होती. 'सिर तन से जुदा', अशा टाईपची लाईन तिन्ही पत्रामध्ये लिहिण्यात आलेली होती. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना त्यांच्यासोबत असलेली सुरक्षा त्यांना वाचू शकली नाही, त्या तुलनेत तर आमदाराला काहीच सुरक्षा नसते. ती सुरक्षा जरी असली, तरीही जिवंत मारू. धड शरीरापासून वेगळा करू. आम्ही बकरे कापणारे आहोत. अशा पद्धतीची ती तीन पत्र मला काल मिळालेली आहेत, आता या संदर्भात पोलिसात तक्रार देण्यात आलेली आहे, पोलीस तपास करत आहेत, अशी माहिती श्वेता महाले यांनी दिली आहे

एकनाथ शिंदेंना धमकी देणारे बुलढाण्याचेच

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची गाडी बॉम्बने उडवून टाकण्याची धमकी देणाऱ्या दोघां आरोपींना देखील बुलढाण्यातूनच ताब्यात घेतलं आहे. या दोन आरोपींना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव येथून मुंबई एटीएसने कारवाई करत ताब्यात घेतलं आहे. मंगेश वायाळ व अभय शिंगणे असं या आरोपीचे नाव आहे. मंगेश वायाळ हा ट्रक चालक असून अभय शिंगणे याचं देऊळगाव येथे मुख्य मार्गावर मोबाईल शॉपी आहे. हे दोघेही संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान संघटनेची संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे. या दोघांनाही दारूचे व्यसन असून या दोघांनी अभय शिंगणे याच्या मोबाईल शॉपीतून ही धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे दोघेही नात्याने मामा आणि भाचे आहेत. मंगेश हा नात्याने अभयचा मामा आहे. रात्री दोन वाजता मुंबई एटीएसने कारवाई करत देऊळगाव येथून या दोघांना ताब्यात घेतलं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Pankaja Munde Majha Vision|संतोष देशमुख, धनूभाऊंचा राजीनामा,माझा व्हिजनवर पंकजा मुंडे भरभरून बोलल्याAjit Pawar Majha Vision: धनंजय मुंडेंचा राजीनामा ते नितेश राणेंवर रोखठोक भाष्य, अजित पवारांचं व्हिजनSpecial Report Jaykumar Gorhe : जयकुमार गोरेवर गंभीर आरोप, आता खंडणीसाठी अटक नेमकं प्रकरण काय?Imtiaz Jaleel Majha Vision| नागपूर दंगल ते औरंगजेब, माझा व्हिजनमध्ये जलीलांचा भाजप, आझमींवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
जयकुमार गोरेंवरील आरोप प्रकरणी महिलेनंतर शिवसेना उप जिल्हाप्रमुखास अटक; अनेक मोठ-मोठी नावे पुढे येणार
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही;  मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
मुंबईतील धारावीची एक इंचही जागा अदानीला देणार नाही; मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत ग्वाही
Aaditya Thackeray : भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
भाजपच्या प्रत्येक नेत्यांची, मंत्र्यांची मुलं परदेशात शिकली, ते येणार आहेत का कबर खोदायला? आगी लावणाऱ्यांचे काही जात नाही; आदित्य ठाकरेंकडून 'रोखठोक' व्हिजन
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
खोली भरुन रोकड सापडताच न्यायमूर्तींची बदली, वकील संघटना म्हणाली आम्ही कचरा नाही, आमच्याकडे नको; SC चे स्पष्टीकरण
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
स्तन पकडणे, पायजम्याची नाडी खोलणे बलात्कार नाही; अलाहाबाद कोर्टाच्या निकालावर संताप, नीलम गोऱ्हेंचं सर्वोच्च न्यायालयास पत्र
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
राज्यातील एकही लाडकी बहीण वंचित राहणार नाही; एकनाथ शिंदेंचा शब्द; म्हणाले, कुठलीच योजना बंद नाही
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
आग्र्यात शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक, शासनाचा GR निघाला; पर्यटन विभागाकडे जबाबदारी, असणार 'लय भारी'
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का?  दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Video: उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंना फोन केला का? दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरे म्हणाले, शीsss..
Embed widget

We use cookies to improve your experience, analyze traffic, and personalize content. By clicking "Allow All Cookies", you agree to our use of cookies.