एक्स्प्लोर
IND vs PAK : भारताविरुद्धच्या मॅचपूर्वी पाकिस्तानचा पाय खोलात, आयसीसीनं केली मोठी कारवाई, जाणून घ्या महत्त्वाचं कारण
IND vs PAK : चॅम्पियन्स ट्रॉफीतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच 23 फेब्रुवारीला होणार आहे. या पूर्वी पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.

पाकिस्तानचा पाय खोलात, आयसीसीची मोठी कारवाई
1/5

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीतील महामुकाबला 23 फेब्रुवारीत दुबईत खेळवला जाणार आहे. या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे.
2/5

पाकिस्तानला पहिल्या पराभावामुळं स्पर्धेतील आव्हान टिकवायचं असल्यास भारताला पराभूत करणं आवश्यक आहे. त्या मॅचपूर्वीच पाकिस्तानवर आयसीसीनं कारवाई केली.
3/5

न्यूझीलंडनं आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिल्या मॅचमध्ये पाकिस्तानला 60 धावांनी पराभूत केलं होतं. कराचीत झालेल्या मॅचमध्ये धीम्या ओव्हर गतीमुळं पाकिस्तानच्या टीमला मॅच फीच्या 5 टक्के दंड करण्यात आला आहे.
4/5

ग्राऊंडवरील अम्पायर रिचर्ड केटलबरो आणि शारफुद्दोला , थर्ड अम्पायर जोएल विल्सन, चौथे पंच एलेक्स व्हार्फ यांनी आरोप निश्चिती केली. त्यानुसार मॅच रेफरी एंडी पाईकाफ्ट यांनी दंड लावला. पाकिस्तानला मॅच फीच्या 5 टक्के दंड आकारण्यात आला. पाकचा कॅप्टन मोहम्मद रिझवाननं चूक मान्य केली. आयसीसीच्या आचारसंहितेच्या अनुच्छेद 2.22 नुसार प्रत्येक खेळाडूच्या मॅच फी मधून 5 टक्के रक्कम दंड म्हणून वजा केली जाईल.
5/5

न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर पाकिस्तानच्या संघाला ग्रुप स्टेजमधूनच स्पर्धेतून बाहेर जावं लागू शकतं. भारतानं आणि न्यूझीलंडनं एक एक विजय मिळवला आहे. भारतानं पाकिस्तानला पराभूत केल्यास पाक स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतं. भारतानं न्यूझीलंडला आणि पाकला हरवल्यास ते सेमी फायनलमध्ये जातील.भारत आणि न्यूझीलंडनं दोन दोन सामने जिंकल्यास दोन्ही संघ सेमी फायनलमध्ये जाऊ शकतात.
Published at : 21 Feb 2025 12:43 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
