Kerala Final Ranji Trophy : हेल्मेटवर आपटून देवानेच झेल हातात आणून दिला, केरळ 74 वर्षांनी रणजीच्या फायनलमध्ये, अफलातून कॅचचा VIDEO व्हायरल
Kerala vs Gujarat Ranji Trophy : अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी उपांत्य सामन्याच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी केरळने इतिहास रचला.

Kerala vs Gujarat Ranji Trophy : अहमदाबादमध्ये खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी उपांत्य सामन्याच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी केरळने इतिहास रचला. केरळने 74 वर्षांत प्रथमच रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. तेही पहिल्या डावात फक्त 2 धावांच्या आघाडीच्या आधारावर. केरळला अंतिम फेरीत पोहोचण्यात नशिबाने खुप साथ दिली. सामन्याच्या शेवटच्या दिवशी एका कॅचने केरळचे नशीब बदलले आणि ते अंतिम फेरीत पोहोचले. ज्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
रणजी ट्रॉफी उपांत्य फेरीच्या शेवटच्या दिवशी गुजरातचा दहाव्या क्रमांकाचा फलंदाज अर्जन नागवासवालाने विजयाच्या आशेने एक स्लॉग स्वीप शॉट खेळला, पण चेंडू शॉर्ट लेगवर उभ्या असलेल्या सलमान निजारच्या हेल्मेटला लागला आणि नंतर स्लिपवर उभ्या असलेल्या कर्णधार सचिन बेबीकडे जातो. या विचित्र विकेटमुळे गुजरात पहिल्या डावात 455 धावांवर ऑलआऊट झाली तर केरळने पहिल्या डावात 457 धावा केल्या होत्या.
अशाप्रकारे, केरळला पहिल्या डावात 2 धावांची आघाडी मिळाली. शुक्रवारी सामन्याचा शेवटचा दिवस असल्याने थेट निकाल अपेक्षित नाही. नियमांनुसार, पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या संघाला विजयी घोषित केले जाते. या परिस्थितीत केरळने अंतिम फेरी गाठली.
47 वर्षांनंतर केरळ पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीच्या अंतिम फेरीत
1951-52 मध्ये पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी खेळणाऱ्या केरळ संघाने 74 वर्षांनंतर या प्रतिष्ठित स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात केरळने पहिल्या डावात 457 धावा केल्या होत्या, ज्याच्या प्रत्युत्तरात गुजरातचा संघ फक्त 455 धावांवर मर्यादित राहिला. केरळचा विजय जलज सक्सेना आणि आदित्य सरवटे यांच्यामुळे झाला, फेरीत केरळचा सामना विदर्भाशी होण्याची शक्यता आहे.
1⃣ wicket in hand
— BCCI Domestic (@BCCIdomestic) February 21, 2025
2⃣ runs to equal scores
3⃣ runs to secure a crucial First-Innings Lead
Joy. Despair. Emotions. Absolute Drama! 😮
Scorecard ▶️ https://t.co/kisimA9o9w#RanjiTrophy | @IDFCFIRSTBank | #GUJvKER | #SF1 pic.twitter.com/LgTkVfRH7q
या कॅच आउटबाबत काय आहे नियम ?
हा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2017 मध्ये लागू केला होता. याअंतर्गत, जर चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हेल्मेटला लागल्यावर पकडला गेला तर फलंदाजाला बाद घोषित केले जाईल. 2014 मध्ये ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू फिलिप ह्यूजेसच्या डोक्यावर चेंडू लागल्याने मृत्यू झाल्यानंतर हा नियम लागू करण्यात आला. त्यानंतर नियमांमध्ये बदल करण्यात आले जेणेकरून फलंदाज, यष्टीरक्षक आणि जवळच्या क्षेत्ररक्षकाने हेल्मेट घालावे.
एमसीसीच्या जागतिक क्रिकेट समितीने, ज्यामध्ये रिकी पॉन्टिंग, कुमार संगकारा आणि सौरव गांगुली सारखे दिग्गज खेळाडूंचा समावेश होता, त्यांनी शिफारस केली होती.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
