Anandache Paan : सविता दामले यांच्यासोबत तुर्की पुस्तकाविषयी गप्पा : आनंदाचे पान : ABP Majha
आता आपल्याला ज्या भाषा वाचता येतात त्यातलं साहित्य आपण कसंही मिळवून वाचतोच, पण ज्या भाषा आपल्याला येतच नाहीत, त्यतील समृद्ध साहित्यापासून मात्र आपण वंचितच राहतो. अशावेळी आपल्या मदतीला येतात ते अनुवादक. त्यांच्या भाषा संपन्नतेमुळे ते आपल्यासारख्या वाचकांना अनुभव संपन्न करत असतात. तर आज अशाच एका मूळ तुर्की पुस्तकाविषयी आपण गप्पा मारणार आहोत. पुस्तकाचं नाव आहे अहमेत उमित – मराठी नाव इस्तंबुलची स्मृतिचिन्हे—ही एक दीर्घ अशी कादंबरी आहे. तेव्हा तुर्की साहित्यातल्या कादंबरीबद्दल उत्सुकता वाटणं सहाजिकच आहे. आणि या पुस्तकाच्या अनुवादिका आहेत सविता दामले. खरं तर सविता दामले यांनी कितीतरी इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद केलाय. त्यांनी अनुवादा पलिकडेही बरंच लेखन केलंय, आणि या पुस्तकाच्या आधीही त्यांनी तुर्की साहित्य आपल्यापर्यंत पोहचवलंय..
All Shows





महत्त्वाच्या बातम्या


























