Anandache Paan : 780 भाषा शोधणारे पद्मश्री Ganesh Devi यांच्याशी 'द इंडियन्स' या महाग्रंथाबद्दल गप्पा 25 January 2025
Anandache Paan : 780 भाषा शोधणारे पद्मश्री Ganesh Devi यांच्याशी 'द इंडियन्स' या महाग्रंथाबद्दल गप्पा 25 January 2025
आज एका ग्रंथाविषयी नाही तर ज्याला एक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि मोठं प्रोजेक्ट म्हणता येईल अशा एका महाग्रंथाविषयी चर्चा करणार आहोत. तितक्याच मोठ्या लेखक आणि भाषाशास्त्रज्ञांकडून..७८० भाषा शोधणारे, आदिवासींच्या प्रश्नांसाठी झोकून देऊन काम करणारे पद्मश्री डॉ गणेश देवी.
गणेश देवी सरांचं भाषा विषयक योगदान खूप मोठंय, तितकंच मोठं आहे इन्डियन्स हे प्रोजेक्ट, हा ग्रंथ भारतीय उपखंडाचा गेल्या बारा हजार वर्षांचा इतिहासाचा अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने संकलन करतो. खरं तर हा भारतीय उपखंडाच्या इतिहासाचा सर्वात मोठा संदर्भ ग्रंथ आहे असं म्हणावं लागेल..
द इंडियन्स
अनेक सहस्त्रकांचा आपला समग्र इतिहास असं या ग्रंथाचं संपूर्ण नाव
.......
संपादन : गणेश देवी, टोनी जोसेफ, रवी कोरीसेट्टर
अनुवाद : शेखर साठे, प्रमोद मुजुमदार, नितिन जरंडीकर, ज्ञानदा असोलकर