![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
IPL New Teams : IPL 2022 च्या नव्या टीम्ससाठी बीसीसीआयकडून किमान किंमत निश्चित
IPL 2022 : अदानी ग्रुप, आरपीजी संजीव गोयंका ग्रुप आणि प्रसिद्ध फार्मा कंपनी टोरेंट नवीन फ्रँचायझी विकत घेण्यासाठी आघाडीवर आहेत.
![IPL New Teams : IPL 2022 च्या नव्या टीम्ससाठी बीसीसीआयकडून किमान किंमत निश्चित ipl new franchise bcci sets 2000 crore as base price for two new franchise IPL New Teams : IPL 2022 च्या नव्या टीम्ससाठी बीसीसीआयकडून किमान किंमत निश्चित](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/18/35d44aaa9e39c8734a286117d0ae50f5_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
IPL New Teams : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) इंडियन प्रीमियर लीगच्या 2022 मध्ये होणाऱ्या पुढील सीजनमध्ये आणखी दोन फ्रँचायझींचा समावेश करणार आहे. बीसीसीआयने या संघांची मूळ किंमत 2000 कोटी रुपये निश्चित केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवीन फ्रँचायझीच्या लिलावादरम्यान ही रक्कम 5000 कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची बोर्डाला अपेक्षा आहे. अदानी ग्रुप, आरपीजी संजीव गोयंका ग्रुप आणि प्रसिद्ध फार्मा कंपनी टोरेंट नवीन फ्रँचायझी विकत घेण्यासाठी आघाडीवर आहेत.
आयपीएलमध्ये सध्या आठ संघ सहभागी झाले आहेत. मात्र पुढील सीजनपासून, 10 संघ त्यात खेळताना दिसू शकतील. बोर्डाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत दोन नवीन फ्रँचायझींच्या बोली प्रक्रियेबाबतचे सर्व नियम ठरवण्यात आले आहेत. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, "कोणतीही कंपनी 75 कोटी रुपये जमा करून बोली दस्तऐवज खरेदी करू शकते. आधी नवीन फ्रँचायझीची मूळ किंमत 1700 कोटी रुपये ठेवण्याचा विचार बोर्ड करत होता. परंतु नंतर ही किंमत 2000 कोटी रुपये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
बीसीसीआयला लिलावातून 5000 कोटी रुपये उभारण्याची आशा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय या दोन नवीन फ्रँचायझींसाठी बोली प्रक्रियेतून 5000 कोटी रुपये उभारण्याची आशा करत आहे. पुढील वर्षी या स्पर्धेत 74 सामने खेळले जातील आणि ते सर्वांसाठी पर्वणी ठरणार आहेत. माहितीनुसार, फक्त त्या कंपन्या या नवीन फ्रँचायझीसाठी बोली लावण्यास सक्षम असतील ज्यांची वार्षिक उलाढाल 3000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
IPL 2021: आयपीएलपूर्वी दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबादसाठी आनंदाची बातमी!
या नवीन फ्रँचायझींच्या ठिकाणांविषयी बोलायचे झाल्यास, अहमदाबाद, लखनौ आणि पुणे या शर्यतीत आघाडीवर आहेत. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम आणि लखनौमधील एकाना स्टेडियम प्रेक्षकांना सामावून घेण्याच्या क्षमतेमुळे या नवीन फ्रँचायझींची निवड होऊ शकते. यापूर्वी आयपीएलच्या चौथ्या हंगामात 10 संघ खेळले होते. कोची टस्कर्स आणि पुणे वॉरियर्स इंडिया त्यावेळी स्पर्धेत सहभागी होते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)