Priyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझा
Priyanka Gandhi Shirdi Speech : प्रियांका गांधींची शिर्डीत भव्य सभा; मोदींवर निशाणा #abpमाझा
देशातील या भूमीने देशाला दिशा दाखवली आहे... स्वातंत्र्याची लढाई इथूनच मजबूत झाली... जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले.. तोच साधू ओळखावा... देव तेथेची जाणावा मराठीतून श्लोक म्हणत संत तुकारामांचा दाखला देत मानवतेचा संदेश दिला.. साईबाबांचा समानतेचा मानवतेचा संदेश हाच खूप महत्त्वाचा... मोदीजींच्या राज्यात सत्याची बाजू कुठे राहिली आहे... त्यांचे मंत्री असो अथवा विधायक काहीही बोलू शकतात... याच महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचा देखील अपमान होत आहे संसदेबाहेरील शिवाजी महाराजांची प्रतिमा उद्यांनी हटवली... सिंधुदुर्गातील पुतळा देखील पडला... मोदीजी एैका.. मी राहुल गांधीची बहीण आहे... मी बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेते... बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा वेगळी होती मात्र शिवाजी महाराजांचा अपमान त्यांनी सुद्धा सहन केला नसता मोदींना मी आव्हानं देते त्यांनी जातीय जनगणना करणार असल्याचं एकदा जाहीर करावे... राहुल गांधींना मोदी घाबरू लागले म्हणून त्यांच्यावर टीका करण्याचं काम मोदी करतात... महाराष्ट्रातील अनेक उद्योग बाहेर घेऊन गेले... दुसऱ्या राज्यात घेऊन गेले.. ही समानता आहे का ? इंदिराजींनी अनेक निर्णय घेतले पण भेदभाव केला नाही... मोठे मोठे उद्योग आज महाराष्ट्रातून काढून नेले.. बेरोजगारी वाढवली... आणि आज महाराष्ट्र मजबूत करण्याचं सभेतून बोलतात... ( अनेक कंपन्यांची नावे घेत टीका ) तुमचं लक्ष विचलित करण्या शिवाय हे कोणत काम करत नाही... मोदी भाषणातून आतंक नहीं है म्हणतात एकदा महाराष्ट्रातील लोकांना भेटा त्यानंतर ते सांगतील काय आतंक आहे... महागाई, बेरोजगारी अशा अनेक समस्या आज आहेत... पंधराशे रुपयांचे आता दिले मात्र तुमच्या कडून किती घेतले जातात हा सुद्धा विचार केला पाहिजे... निवडणूक आली म्हणून पैसे दिले जातायत... दहा वर्ष यांचं सरकार देशात.. राज्यात अडीच वर्ष सरकार मग आजच का योजना आणली... नवीन रोजगार तयार करायचे नाही आणि मंचावर येऊन आज मोदी सरकार अस म्हणता... शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत.. शेतकरी आज संकटात.. कोणत्या तोंडाने तुम्ही महाराष्ट्र पुढे नेणार म्हणता... मोदींनी सगळ्यांना कमकुवत करण्याचं काम केलं.. उद्योगपतींना मात्र कर्जमाफी... शेतकऱ्यांना काय मिळालं... पैसे नाही म्हणतात मग उद्योगपतींचे कर्ज माफ कसे झाले... तुम्हाला उत्तर द्यावे लागेल... दोन लाख सरकारी पदे आज रिक्त.. ती सुद्धा भरली जात नाही.. युवक आत्महत्या करायला लागेल... जातीच्या नावावर लक्ष विचलित करण्याचं काम यांच्याकडून सुरू.. संविधान बाबत यांना गांभीर्य नाही... इथे महाविकास आघाडी सरकार आलं आणि त्यानंतर पैसे, ईडीचा वापर करून सरकार तोडल... जनता सगळ पाहत आहे.. कशा पद्धतीने आमदार पळून जातात त्यांना पैसे दिले जातात.. कुठून येतो हा पैसा..