Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला, धोरण फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जिथं भाजप सरकार तिथं नोकऱ्या नाहीत; बजरंग पुनियांचा हल्लाबोल
जिथं भाजप सरकार आहे तिथे नोकऱ्या नाहीत. कोल्हापुरी कुस्तीची भूमी आणि शाहू महाराजांची पवित्र भूमी असल्याने मी या ठिकाणी आलो असल्याचे बजरंग पुनिया म्हणाले.
Bajrang Punia In Kolhapur : भाजपकडून एमएसपीचा जुमला करण्यात आला, धोरण फसल्याने देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 38 टक्के आत्महत्या होत आहेत. त्यामुळे वादे करूनही भाजपकडून काहीच झाले नाही, भाजपकडून फक्त फसवणूक झाल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते बजरंग पुनिया यांनी आज कोल्हापूरमध्ये केली. कोल्हापूरमध्ये आज (16 नोव्हेंबर) काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची सभा झाली. या सभेमध्ये बोलताना बजरंग पुनिया यांनी भाजपवर हल्लाबोल केला.
जिथं भाजप सरकार आहे तिथे नोकऱ्या नाहीत
बजरंग पुनिया म्हणाले की छत्रपती शाहूंची भूमी ही कुस्तीची भूमी आहे आणि कुस्तीच्या भूमीमध्ये मी आलो आहे. बजरंग पुनिया यांनी सांगितले की, येथील राज्यसभा खासदार महिलांना धमकी देतात. यांच्याकडून कोणती अपेक्षा ठेवणार असे म्हणत त्यांनी भाजप खासदार धनंजय महाडिकांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. त्यांनी पुढे सांगितले की शेतकऱ्यांना एमएसपी देणार असं भाजपकडून सांगण्यात आलं. मात्र यातील काहीच दिलं नसल्याचे बजरंग पुनिया म्हणाले. जिथं भाजप सरकार आहे तिथे नोकऱ्या नाहीत. कोल्हापुरी कुस्तीची भूमी आणि शाहू महाराजांची पवित्र भूमी असल्याने मी या ठिकाणी आलो असल्याचे बजरंग पुनिया म्हणाले.
प्रियांका गांधींकडून मोदी आणि शाहांना जाहीर आव्हान
दरम्यान, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी आज शिर्डीत सभा घेतली. सभेला संबोधित करताना प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिले आहे. त्यांनी (मोदी आणि शहा) मंचावरून उभे राहून जात जनगणना करणार आणि आरक्षणावरील 50 टक्के मर्यादा हटवणार असल्याचे जाहीर करावे, असे प्रियांका म्हणाल्या. प्रियांका गांधी म्हणाल्या की, भाजपवाले म्हणतात माझा भाऊ आरक्षणाच्या विरोधात आहे. न्याय मागण्यासाठी मणिपूर ते मुंबई पायी चाललेली व्यक्ती आरक्षणाच्या विरोधात आहे, तर न्याय मागण्यासाठी कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत पायी चाललेली व्यक्ती आरक्षणाच्या विरोधात असल्याचे सांगितले जाते. भाजपवाले घाबरतात म्हणून खोटे बोलतात.
इतर महत्वाच्या बातम्या