Sakri Vidhan Sabha Election Result 2024 : साक्री मतदारसंघाच्या तिरंगी लढतीत मंजुळा गावित विजयी, चौरे, सूर्यवंशींना चारली पराभवाची धूळ
Sakri Vidhan Sabha Election Result 2024 : 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत मंजुळा गावित यांनी मोहन सूर्यवंशी यांचा 7 हजार 265 मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला होता.
Sakri Vidhan Sabha Constituency : धुळे (Dhule) जिल्ह्यातील साक्री हा आदिवासी बहुल राखीव मतदार संघ आहे. काँग्रेसचा (Congress) बालेकिल्ला म्हणून हा मतदार संघ ओळखला जातो. मात्र साक्री विधानसभा मतदारसंघात (Sakri Vidhan Sabha Constituency) 2019 च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांनी बाजी मारली होती. यंदाच्या निवडणुकीत या मतदारसंघात तिरंगी लढत झाली. महायुतीतून (Mahayuti) शिवसेना शिंदे गटाकडून (Shivsena Shinde Group) मंजुळा गावित (Manjula gavit), महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) काँग्रेसचे उमेदवार प्रवीण चौरे (Pravin Chaure) आणि भाजपमधून बंडखोरी केलेले मोहन सूर्यवंशी (Mohan Suryawanshi) यांच्यात सामना रंगला होता. या लढतीत मंजुळा गावित 5 हजार 584 मतांनी विजयी झाल्या आहेत.
साक्री विधानसभा मतदारसंघाची जागा आतापर्यंत 8 वेळा काँग्रेसनी जिंकली आहे. 1951 मध्ये अस्तित्वात आलेल्या या विधानसभेच्या जागेवर 1972 ते 1980 पर्यंत सलग तीन वेळेस काँग्रेसने वर्चस्व प्रस्थापित केले. मात्र, त्यानंतर पुढील तीन निवडणुकांमध्ये या जागेवर भाजपची सत्ता राहिली. यानंतर 1999 च्या निवडणुकीत बीबीएम पक्षाने अनपेक्षितपणे ही जागा काबीज केली होती. यानंतर, 2004, 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत काँग्रेसने पुनरागमन केले आणि सलग तीन वेळा ही जागा जिंकली. परंतु 2019 च्या निवडणुकीत विजयाची मोहीम काँग्रेसला सुरू ठेवता आली नाही.2019 च्या निवडणुकीत भाजपचे मोहन सूर्यवंशी आणि काँग्रेसचे धनाजी अहिरे यांच्यात मुख्य लढत झाली होती. मात्र, अपक्ष उमेदवार मंजुळा गावित यांनी काँग्रेस आणि भाजपला मोठा धक्का दिला होता. मंजुळा गावित यांनी मोहन सूर्यवंशी यांचा 7 हजार 265 मतांच्या फरकाने पराभव करत विजय मिळवला होता.
साक्री विधानसभेत मंजुळा गावित विजयी
यंदाच्या निवडणुकीत साक्रीची जागा जिंकण्यासाठी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्ष सर्वतोपरी प्रयत्न केले. याशिवाय इतर पक्षांनी देखील आपली पूर्ण ताकद लावण्याचा प्रयत्न केला. मागील निवडणुकीत अपक्ष लढलेल्या मंजुळा गावित यांना शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर काँग्रेसकडून प्रवीण चौरे मैदानाच्या आखाड्यात होते. तर महायुतीत ही जागा शिवसेना शिंदे गटाला गेल्याने भाजपचे मोहन सूर्यवंशी यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी निवडणुकीच्या रिंगणात उतरले. या तिरंगी लढतीत मंजुळा गावित यांनी बाजी मारली. मंजुळा गावित यांच्या विजयानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.
आणखी वाचा