Watch : रिंकूने सलग 5 षटकार लगावले 'त्या' बॅटची स्टोरी काय? नीतीश राणाने सांगितले...
IPL 2023 : पाच चेंडूत 29 धावांची गरज... सामना गुजरात जिंकणार असेच प्रत्येकाला वाटत होते. पण त्याचवेळी रिंकू सिंह याने आपला करिश्मा दाखवला.

IPL 2023, Rinku Singh Bat Story : पाच चेंडूत 29 धावांची गरज... सामना गुजरात जिंकणार असेच प्रत्येकाला वाटत होते. पण त्याचवेळी रिंकू सिंह याने आपला करिश्मा दाखवला. यश दयालच्या पाच चेंडूवर सलग पाच षटकार लगावत रिंकू सिंह याने कोलकात्याला थरारक विजय मिळवून दिला. या विजयानंतर रिंकूची सगळीकडेच चर्चा सुरु झाली... आजी-माजी क्रिकेटपटूपासून क्रीडा तज्ज्ञांनी रिंकूच्या कौतुकाचे पूल बांधले. रिंकून गुजरातकडून विजय हिरावून आणला.. पण रिंकू सिंह याने लागोपाठ षटकार लगावलेल्या त्या बॅटची एक वेगळी स्टोरी आहे... कोलकात्याचा कर्णधार नीतीश राणा याने त्या बॅटबद्दल सामन्यानंतर सांगितलेय... याचा व्हिडीओ कोलकात्याने आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर पोस्ट केलाय.
नीतीश राणाच्या बॅटने लगावले सलग पाच षटकार -
रिंकू सिंह याने अखेरच्या षटाकात पाच चौकार लगावत थरारक विजय मिळवून दिला. रिंकूने ज्या बॅटने पाच षटकार लगावले ती बॅट नीतीश राणा याची होती..9 एप्रिल रोजी नीतीश राणा याने आपली बॅट रिंकू सिंह याला दिली होती. नीतीश राणा याने आयपीएल 2022 आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये हीच बॅट वापरली होती. त्याशिवाय यंदाच्या हंगमातील पहिल्या दोन सामन्यात नीतीश राणा याने याच बॅटने फलंदाजी केली होती. पण 9 एप्रिल रोजी नीतीश राणा याने ही बॅट रिंकू सिंह याला दिली.. केकेआरचा कर्णधार नीतीश राणा याने सामन्यानंतर याचा खुलासा केला. ते म्हणतो.. रिंकू सिंह याने बॅट मागितली होती. मला बॅट द्यायची नव्हती. पण आतमधून कुणीतरी बॅट घेऊन आले. मला माहित होते, रिंकू ही बॅट घेणार आहे, कारण याचे वजन कमी आहे. तसेच त्याचा पिक-अप चांगला आहे. आता ही बॅट रिंकूचीच असेल.
पाहा कोलकात्याने पोस्ट केलेला व्हिडीओ
Rinku claimed the match & 𝘵𝘩𝘦 𝘣𝘢𝘵! 💜#GTvKKR | #AmiKKR | #TATAIPL 2023 | @NitishRana_27 | @rinkusingh235 pic.twitter.com/vHWVROar8P
— KolkataKnightRiders (@KKRiders) April 9, 2023
रिंकू सिंहने ज्याला 5 षटकार ठोकले, तो गोलंदाज कोण?
आयपीएल 2023 च्या तेराव्या सामन्यात गुजरात टायटन्स संघासमोर कोलकाता नाईट रायडर्सचं आव्हान होतं. या सामन्यात केकेआरचा स्टार फलंदाज रिंकू सिंह सामन्याच्या शेवटच्या 5 चेंडूंवर सलग पाच षटकार ठोकून सर्वांनाच धक्का दिला. रिंकूने अशक्य ते शक्य करुन दाखवलं. या धमाकेदार खेळीमुळे रिंकू सिंह रातोरात सुपरस्टार झाला आहे. पण, यश दयालसाठीही सामना अविस्मरणीय ठरला. या सामन्यात रिंकू सिंहने मित्र यशला चांगलंच झोडपलं. या सामन्यात यशने 4 षटकात 69 धावा दिल्या आहेत. रिंकू सिंह आणि यश दयाल दोघेही चांगले मित्र आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये चांगले संबंध आहेत. प्रसंगी दोघेही एकमेकांना प्रोत्साहन देताना दिसतात. अलीकडेच आयपीएल सामन्यात रिंकू सिंहच्या आरसीबी (RCB) विरुद्धच्या धडाकेबाज खेळीनंतर यशने रिंकूचं कौतुक केलं होतं. त्यानंतर दोनचं दिवसांनी रिंकूनं त्याचं मित्राला अडचणीत टाकलं आहे. यश दयाल हा उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा रहिवासी आहे. यशचे वडील चंद्रपाल हे देखील त्यांच्या काळातील चांगले वेगवान गोलंदाज होते. एवढेच नाही तर या गोलंदाजाची आयपीएल 2022 मधील शानदार कामगिरीनंतर बांगलादेश दौऱ्यासाठी भारतीय संघात यश दयालची निवड झाली. पण यशला अद्याप पदार्पणाची संधी मिळालेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
