Rahul Tripathi : 'एक संधी मिळायला हवी होती', राहुल त्रिपाठीची दक्षिण आफ्रिकेविरुद्ध निवड न झाल्याने हरभजन नाराज
India tour of south Africa : आयपीएल संपल्यानंतर लगेचच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच टी20 सामने खेळणार असून यासाठी संघनिवडही झाली आहे.
IND vs SA, T20 Series : भारत-दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 9 जून पासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाची घोषणा केली. यावेळी दिग्गज खेळाडू विश्रांतीवर असून बऱ्याच युवांना संधी मिळाली आहे. आय़पीएलमधील खेळाडूंच्या कामगिरीच्या जोरावर ही निवड झाली आहे. उमरान मलिक, अर्शदीप सिंह यांना भारतीय संघात एन्ट्री आयपीएलमधील खेळीमुळेच झाली आहे. पण आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करुनही हैदराबादच्या राहुल त्रिपाठीला मात्र संधी मिळेलेली नाही. याबाबत माजी फिरकीपटू हरभजनने आपली प्रतिक्रिया देत, 'राहुलला एक संधी मिळायला हवी होती', असं ट्वीट केलं आहे.
राहुल त्रिपाठीने यंदाच्या आयपीएलमधील 14 सामन्यात 37.55 च्या सरासरीने आणि 158.24 च्या स्ट्राईक रेटने 413 रन केले आहेत. ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, दीपक हुडा, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, वेंकटेश अय्यर अशा सिलेक्ट झालेल्या बऱ्याच खेळाडूंपेक्षा राहुलची कामगिरी चांगली असूनही त्याला संधी मिळेलेली नाही. त्यामुळे निवडकर्त्यांच्या या निर्णयावर हरभजन सिंह नाराज असून त्याने ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे. या ट्वीटमध्ये हरभजनने लिहिलं आहे, 'राहुल त्रिपाठीचे नाव भारतीय संघात नसल्याने मी निराश झालो आहे. त्याला एक संधी मिळायला हवी होती.'
केएल राहुलला कर्णधारपद
सध्या सर्वत्र आयपीएलची हवा सुरु आहे. प्लेऑफचे चार संघ समोर आले असून 29 मे रोजीतर आयपीएल फायनल पार पडणार आहे. त्यानंतर लगेचच आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघात असणारे भारतीय खेळाडू एकत्र येऊन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हात करणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार असून यावेळी 5 टी20 सामने खेळवले जाती. यासाठी नुकताच संघ जाहीर झाला आहे. यामध्ये केएल राहुलकडे कर्णधारपद तर पंतकडे उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. याशिवाय खराब फॉर्ममुळे संघाबाहेर गेलेल्या हार्दीकने गुजरात टायटन्सचं कर्णधारपद भूषवत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला संघात पुन्हा संधी मिळाली आहे. याशिवाय आयपीएलमध्ये आपल्या वेगाने सर्वांना हैराण कऱणाऱ्या उम्रानलाही संघात घेतलं असून त्याच्यासोबत अर्शदीपचं नावही आहे. या दोघांना अंतिम 11 मध्ये संधी मिळेल का? हे पाहावे लागेल.
भारतीय टी20 संघ
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.
हे देखील वाचा-
- IPL 2022: आरसीबीचा संघ कोलकात्याला रवाना, एलिमिनेटर सामन्यात लखनौशी भिडणार; कसं असेल प्लेऑफचं वेळापत्रक?
- Umran Malik: 'हे सर्व त्याच्या मेहनतीमुळं घडलं' भारतीय संघात स्थान मिळवलेल्या उमरान मलिकचे वडील भावूक
- IPL 2022: आयपीएलमध्ये शिखर धवन चौकारांचा बादशाह! विराट, वार्नर, रोहितलाही गाठता नाही आला 'हा' आकडा