एक्स्प्लोर

Team India Champions Trophy : चॅम्पियन्स ट्रॉफीआधी BCCI चा तडकाफडकी मोठा निर्णय; टीम इंडिया 'या' संघांसोबत खेळणार नाही सराव सामने!

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचे लक्ष 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर असणार आहे.

India To Not Play Any Warm-Up Games Ahead Of Champions Trophy 2025 : बुधवारी (12 फेब्रुवारी) भारतीय संघाने तिसरा सामना 142 धावांनी जिंकून 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडचा 3-0 असा पराभव केला. आता, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचे लक्ष 19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवर असणार आहे. दरम्यान, बीसीसीआयने दुबईमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वीचा सराव सामना न खेळण्याचा निर्णय घेतल्याची बातमी आहे.

पाकिस्तान आणि संयुक्त अरब अमिराती यांच्या यजमानपदाखाली 19 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. अशा परिस्थितीत, बुधवारी या स्पर्धेच्या सराव सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे, जे 14 ते 17 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. पाकिस्तानने बुधवारी सराव सामन्यांसाठी  3 शाहीन संघाची (पाकिस्तान अ संघ) घोषणा केली, जे अनुक्रमे बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तानविरुद्ध सराव सामने खेळतील. 

भारतीय संघ 15 फेब्रुवारी रोजी दुबईला जाणार....

वृत्तसंस्था पीटीआयनुसार, भारत आपले सर्व सामने दुबईमध्ये खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेमुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) सराव सामने न खेळण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघ 15 फेब्रुवारी रोजी दुबईला पोहोचणार आहे. भारताचे सामने अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशशी होणार होते, पण संघाने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. पण अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश हे त्याचे सामने एकमेकांविरुद्ध खेळतील. अफगाणिस्तान 16 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंडविरुद्ध सराव सामनाही खेळेल.

दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड पाकिस्तानाच! 

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी दोन्ही संघांच्या तयारीचा हा शेवटचा टप्पा असेल. दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड आधीच पाकिस्तानमध्ये आहेत आणि त्रिकोणी मालिका खेळत आहेत. शादाब खान 14 फेब्रुवारी रोजी लाहोरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध संघाचे नेतृत्व करेल, कराचीमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मोहम्मद हुरैरा संघाचे नेतृत्व करेल, तर दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध मोहम्मद हरिस हा कर्णधार असेल. 16 फेब्रुवारी रोजी न्यूझीलंड आणि अफगाणिस्तान यांच्यातील सराव सामना कराची येथे खेळला जाईल.

सराव सामन्यांचे वेळापत्रक

14 फेब्रुवारी – पाकिस्तान शाहीन संघ विरुद्ध अफगाणिस्तान, गद्दाफी स्टेडियम, लाहोर.
16 फेब्रुवारी – न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान, नॅशनल स्टेडियम, कराची.
17 फेब्रुवारी – पाकिस्तान शाहीन संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका, नॅशनल स्टेडियम, कराची.
17 फेब्रुवारी – पाकिस्तान शाहीन संघ विरुद्ध बांगलादेश, आयसीसी क्रिकेट अकादमी, दुबई

(सर्व सामने दिवस-रात्र असतील)

हे ही वाचा -

Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nagpur violence: हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
जवान चंदू चव्हाणची आता पाकिस्तानकडेच मागणी; मला न्याय द्या, संरक्षणमंत्र्यांवर संताप, खासदारांचंही पत्र दाखवलं
जवान चंदू चव्हाणची आता पाकिस्तानकडेच मागणी; मला न्याय द्या, संरक्षणमंत्र्यांवर संताप, खासदारांचंही पत्र दाखवलं
Manoj Jarange Patil : नागपूर दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत; यांना कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही का? मनोज जरांगे यांचा घणाघात
नागपूर दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत; यांना कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही का? मनोज जरांगे यांचा घणाघात
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aurangzeb kabar Controversy : औरंगजेबच्या कबरीचं राजकारण नेमकं काय? A टू Z कहाणी Special ReportAstha Dahikar On Nagpur Rada: रिक्षा अडवली, धमकी दिली, तोडफोड, शिववीगाळ लेक अडकली, आई रडलीShweta Dahirkar On Rada:पै पै जोडून खरेदी केलेली कार जळून खाक,श्वेता दहिकरांनी सांगितला भयानक प्रकारChandrashekhar Bawankule : कुऱ्हाडीने वार झालेले DCP थोडक्यात बचावले, बावनकुळे भेटीसाठी रुग्णालयात

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur violence: हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
हिंसाचारामुळे नागपूरच्या विकासाला लागणार ब्रेक, सरकारने सगळ्या मशिन्स हटवल्या, नेमकं काय घडलं?
जवान चंदू चव्हाणची आता पाकिस्तानकडेच मागणी; मला न्याय द्या, संरक्षणमंत्र्यांवर संताप, खासदारांचंही पत्र दाखवलं
जवान चंदू चव्हाणची आता पाकिस्तानकडेच मागणी; मला न्याय द्या, संरक्षणमंत्र्यांवर संताप, खासदारांचंही पत्र दाखवलं
Manoj Jarange Patil : नागपूर दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत; यांना कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही का? मनोज जरांगे यांचा घणाघात
नागपूर दंगल फडणवीस सरकार पुरस्कृत; यांना कोरटकर, सोलापूरकर दिसत नाही का? मनोज जरांगे यांचा घणाघात
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
कसोटी क्रिकेटमध्ये 362 विकेट्स पटकावल्या पण एकदाही नो बॉल टाकला नाही; डोळे दिपवणारी कारकीर्द पण सध्या भोगतोय तुरुंगवास
उद्योजक पालकांसाठी स्मार्ट बालक बचत: आर्थिक सुरक्षेसाठी रणनीती 
उद्योजक पालकांसाठी स्मार्ट बालक बचत: आर्थिक सुरक्षेसाठी रणनीती 
Sunita Williams : 18 हजार फूट उंचीवर पॅराशूट खुली होणार, समुद्रात लँडिंग, सुनिता विलियम्सचा पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरु
Sunita Williams : 18 हजार फूट उंचीवर पॅराशूट खुली होणार, समुद्रात लँडिंग, सुनिता विलियम्सचा पृथ्वीच्या दिशेनं प्रवास सुरु
पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
पीक विमा अग्रीम घोषणा कागदावरच? परभणीचे लाखो शेतकरी लाभापासून वंचित, संजय जाधव यांचा आंदोलनाचा इशारा
Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य
Nagpur Clash Update : काचा फोडल्या, गाड्या जाळल्या;राड्यानंतर भालदारपुराचं भयावहं दृष्य
Embed widget