Team India Squad against South Africa : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघ जाहीर, केएल राहुलकडे कर्णधारपद तर उमरान मलिकला संधी
India tour of south Africa : आयपीएल संपल्यानंतर लगेचच भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी दोन हात करणार आहे. द. आफ्रिकेचा संघ 9 जूनपासून भारत दौऱ्यावर येणार आहे.
IND vs SA, T20 Series : भारत-दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 9 जून पासून पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेपूर्वी नुकतीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) भारतीय संघाची घोषणा केली आहे. यावेळी केएल राहुलला (KL Rahul) कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे. तर स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) संघात परतला आहे. उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह यांना टीम इंडियाच्या टी20 संघात (Team India squad) पहिल्यांदाच संधी मिळाली असून विराट, रोहित, बुमराहसारखे दिग्गज विश्रांतीवर असणार आहेत.
सध्या सर्वत्र आयपीएलची हवा सुरु आहे. प्लेऑफचे चार संघ समोर आले असून 29 मे रोजीतर आयपीएल फायनल पार पडणार आहे. त्यानंतर लगेचच आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघात असणारे भारतीय खेळाडू एकत्र येऊन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हात करणार आहेत. दक्षिण आफ्रिकेचा संघ भारताच्या दौऱ्यावर येणार असून यावेळी 5 टी20 सामने खेळवले जाती. यासाठी नुकताच संघ जाहीर झाला आहे. यामध्ये केएल राहुलकडे कर्णधारपद तर पंतकडे उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. याशिवाय खराब फॉर्ममुळे संघाबाहेर गेलेल्या हार्दीकने गुजरात टायटन्सचं कर्णधारपद भूषवत दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याला संघात पुन्हा संधी मिळाली आहे. याशिवाय आयपीएलमध्ये आपल्या वेगाने सर्वांना हैराण कऱणाऱ्या उम्रानलाही संघात घेतलं असून त्याच्यासोबत अर्शदीपचं नावही आहे. या दोघांना अंतिम 11 मध्ये संधी मिळेल का? हे पाहावे लागेल.
भारतीय टी20 संघ
केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, वेंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, आवेश खान, अर्शदीप सिंह, उमरान मलिक.
दक्षिण आफ्रिकेचा संघ
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक (विकेटकिपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, अॅनरिक नोर्किया, वेन पारनेल, ड्वेन प्रिटोरियस, कागिसो रबाडा, तबरेज शम्सी, ट्रिस्टन स्टब्स, रासी वॅन डर डसन, मार्को जॅनसेन.
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यांचे वेळापत्रक
सामना | दिनांक | ठिकाण |
पहिला टी20 सामना | 9 जून | अरुण जेटली स्टेडियम, दिल्ली |
दुसरा टी20 सामना | 12 जून | बाराबती स्टेडियम, कट्टक |
तिसरा टी20 सामना | 14 जून | डॉ वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियम,विशाखापट्टणम |
चौथा टी20 सामना | 17 जून | सौराष्ट्र क्रिकेट असोसीएशन स्टेडियम, राजकोट |
पाचवा टी20 सामना | 19 जून | एम. चिन्नस्वामी स्टेडियम बंगळुरु |
हे ही वाचा -