Ind vs Eng 3rd ODI : फलंदाज चालले, गोलंदाजही एकदम ओके! चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडिया पास; ODI मालिकेत इंग्लंडचा उडवला धुव्वा
अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा 142 धावांनी पराभव केला आहे.

India vs England 3rd ODI : अहमदाबादमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने इंग्लंडचा 142 धावांनी पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 356 धावांचा मोठा डोंगर उभा केला, ज्याच्या प्रत्युत्तरात संपूर्ण इंग्लंड संघ 214 धावांवर गारद झाला. भारतीय संघाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो शुभमन गिल होता, ज्याने 112 धावांची शतकी खेळी केली. टीम इंडियाकडून या सामन्यात फलंदाज तर चालले, पण गोलंदाजांनीही कमाल केली. कारण प्रत्येक गोलंदाजाने कमीत कमी एक विकेट घेतली.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्याच षटकात त्याचा निर्णय चांगला ठरला, कारण कर्णधार रोहित शर्मा फक्त 1 धाव करून बाद झाला. पण त्यानंतर शुभमन गिल आणि विराट कोहली यांनी 116 धावांची भागीदारी करून इंग्लंडच्या गोलंदाजांना घाम फोडला. गिलने श्रेयस अय्यरसह 104 धावा जोडल्या. विराट कोहलीने 52 धावांचे योगदान दिले तर अय्यरने 78 धावांचे योगदान दिले.
शुभमन गिलच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सातवे शतक
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेच्या सुरुवातीपासून शुभमन गिल चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याने पहिल्या सामन्यात 87 धावा केल्या आणि नंतर कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात 60 धावा केल्या. अखेर तिसऱ्या सामन्यात तो त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील सातवे शतक पूर्ण करण्यात यशस्वी झाला. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान सात शतके करणारा फलंदाज आहे, त्याने फक्त 50 डावांमध्ये ही कामगिरी केली.
𝐂𝐋𝐄𝐀𝐍 𝐒𝐖𝐄𝐄𝐏
— BCCI (@BCCI) February 12, 2025
Yet another fabulous show and #TeamIndia register a thumping 142-run victory in the third and final ODI to take the series 3-0!
Details - https://t.co/S88KfhFzri… #INDvENG @IDFCFIRSTBank pic.twitter.com/ZoUuyCg2ar
भारतीय गोलंदाजांनीही केली कमाल!
भारतीय फलंदाजांनी प्रथम धावफलकावर 356 धावांचा मोठा डोंगर उभा केला आणि उर्वरित काम गोलंदाजांनी केले. फिल साल्ट आणि बेन डकेट यांनी मालिकेत नियमितपणे इंग्लंडला चांगली सुरुवात करून दिली आहे, परंतु इतर फलंदाज त्याचा फायदा उठवण्यात अपयशी ठरले आहेत. यावेळी दोघांमध्ये 60 धावांची सलामी भागीदारी झाली, पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी इतके वर्चस्व गाजवले की 154 धावांपर्यंत इंग्लंडचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला.
येथून इंग्लंडचा पराभव निश्चित होता. कर्णधार जोस बटलर चांगल्या फॉर्ममध्ये आहे, पण तिसऱ्या सामन्यात तो फक्त 6 धावा काढून बाद झाला आणि जो रूटही 24 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. भारताकडून अर्शदीप सिंग, हर्षित राणा, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. वॉशिंग्टन सुंदर आणि कुलदीप यादव यांनाही प्रत्येकी एक विकेट घेण्यात अपयश आले.
हे ही वाचा -
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
