Team India WTC Schedule 2025-27 : पुढचा WTCचा हंगाम टीम इंडियासाठी असणार अवघड; ऑस्ट्रेलिया नव्हे, तर इंग्लंड, न्यूझीलंड देणार सॉलिड टेन्शन! जाणून घ्या शेड्यूल
ऑस्ट्रेलियाकडून सिडनी कसोटी हरल्याने भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 च्या आशा संपुष्टात आल्या.
Team India WTC Schedule 2025-27 : ऑस्ट्रेलियाकडून सिडनी कसोटी हरल्याने भारताच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 2025 च्या आशा संपुष्टात आल्या. भारताला सलग तिसरी फायनल खेळण्याची संधी होती, पण त्यांनी ती गमावली. आता भारतीय संघाला 2027 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 या वर्षी जूनपासून सुरू होणार आहे. भारत या चॅम्पियनशिप अंतर्गत पहिली मालिका इंग्लंडसोबत खेळणार आहे.
टीम इंडिया जूनमध्ये खेळणार पहिली मालिका
भारत आणि इंग्लंड यांच्यात या वर्षी जून-जुलैमध्ये कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही पाच सामन्यांची मालिका इंग्लंडमध्ये होईल. उभय संघांमधला पहिला कसोटी सामना 20 जूनपासून लीड्स येथे खेळवला जाणार आहे. इंग्लंडहून परतल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ मायदेशात दोन कसोटी मालिका खेळणार आहे. वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेचे संघ 2025 मध्येच भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारत दोन्ही संघांसोबत दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे.
घरच्या मैदानावर 9 सामने, 9 बाहेर…
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 या सायकलमध्ये टीम इंडिया 6 मालिका खेळणार आहे. एकूण 18 सामने होणार आहेत. भारतीय संघाला यातील 9 सामने मायदेशात आणि 9 सामने खेळावे लागणार आहेत. या 18 सामन्यांपैकी भारत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 10 सामने खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया संघ 2026-27 मध्ये भारत दौऱ्यावर येणार आहे.
WTC 2025-27 मध्ये भारताचे वेळापत्रक
जून ते ऑगस्ट 2025 - इंग्लंड विरुद्ध भारत (5 कसोटी)
ऑक्टोबर 2025 - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (2 कसोटी)
नोव्हेंबर 2025 - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (२ कसोटी)
ऑगस्ट 2026 श्रीलंका विरुद्ध भारत (2 कसोटी)
ऑक्टोबर 2026 - न्यूझीलंड विरुद्ध भारत (2 कसोटी)
जानेवारी ते फेब्रुवारी 2027 - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (5 कसोटी)
इंग्लंड-न्यूझीलंड दौरा महत्त्वाचा
WTC 2025-27 अंतर्गत भारताला इंग्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंका दौरे करायचे आहेत. इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला राहिलेला नाही. पण जर भारताला WTC 2025-27 च्या अंतिम फेरीत पोहोचायचे असेल तर त्याला एकतर इंग्लंड किंवा न्यूझीलंडमधील मालिका जिंकावी लागेल किंवा ड्रॉ करावी लागेल. पराभूत झाल्यास अंतिम फेरीचा मार्ग कठीण होऊ शकतो.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025-27 च्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी कोणत्याही संघाला अंदाजे 60 टक्के सामने जिंकावे लागतील. भारताने 2023-25 चक्रातील निम्मे सामने जिंकले, परंतु गुणतालिकेत ते तिसऱ्या स्थानावर राहिले. सध्याच्या WTC सायकलमध्ये भारताने 19 सामने खेळले, त्यापैकी 9 सामने जिंकले. आठ सामने हरले, तर दोन सामने अनिर्णित राहिले.
कोणता संघ किती सामने खेळणार?
पुढील कसोटी चॅम्पियनशिप हंगामात ऑस्ट्रेलियाला जास्त 22 कसोटी खेळायचे आहेत. तर इंग्लंड संघ 21 सामने खेळणार आहे. बांगलादेश आणि श्रीलंका संघ प्रत्येकी किमान 12 कसोटी खेळणार आहेत. याशिवाय न्यूझीलंड 16, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजला 14-14 तर पाकिस्तानला 13 सामने खेळायचे आहेत. स्पर्धेचा अंतिम सामना जून 2027 मध्ये होणार आहे.
हे ही वाचा -