औरंगजेब मूळ भारतीय नसल्याचा दावा, कबर काढण्यासाठी आता हायकोर्टात याचिका, संभाजीनगरात आता एकूण 10 गुन्ह्यांची नोंद
औरंगजेब मूळ भारतीय नसल्याचा दावा, कबर काढण्यासाठी आता हायकोर्टात याचिका, संभाजीनगरात आता एकूण 10 गुन्ह्यांची नोंद

Chhatrapati Sambhajinagar: राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून गेल्या काही दिवसांपासून मोठा गदारोळ सुरुय. विश्व हिंदू परिषद आणि आणि बजरंगदलाच्या आंदोलनानंतर नागपुरमध्ये हिंसाचारही झाला. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमध्ये असणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीला काढून टाका अशी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. पुरातत्व विभागाने या कबरीला दिलेला राष्ट्रीय विशेष दर्जा काढून टाकण्याची मागणी या याचिकेत करण्यात आलीय. दरम्यान, औरंगजेबाच्या कबरीवरून सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्याचा प्रकार सुरुच असून या प्रकरणात छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांत औरंगजेब वादप्रकरणी आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Aurangzeb Tomb)
औरंगजेबाची कबर काढण्यासाठी याचिका दाखल
औरंगजेबाची कबर काढा या मागणीसाठी गेल्या काही दिवसांपासून आंदोलने, हिंसाचार, जाळपोळ, दंगल उसळल्याचा प्रकार झाला. राज्यभरात सत्ताधारी आणि विरोधी पक्षनेत्यांकडून कबर काढण्याची मागणी होत असताना पुरातत्त्व विभागाने कबरीला संरक्षणही दिले. मात्र, आता औरंगजेबाची कबर काढण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. नाशिकचे सामाजिक कार्यकर्ते रतन लथ यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलीय. पुरातत्त्व विभागाने कबरीला दिलेल राष्ट्रीय विशेष दर्जा काढून टाकण्याची मागणी करण्यात आली आहे. औरंगजेब मूळ भारतीय नसल्याचा या याचिकेत दावा करण्यात आलाय.
आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी एकूण 10 गुन्हे
औरंगजेब कबर काढण्याच्या मागणीसंदर्भात सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करण्याचे सत्र सुरु च आहे. औरंगजेब कबर वादप्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांत आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आलेत. सायबर क्राईम पोलिसांकडून शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. औरंगजेब प्रकरणात आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल झाले असून आता आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोशल मीडियावर मॉनिटरिंग करून आक्षेपार्ह पोस्ट शोधण्याचे काम सायबर पोलिसांकडून सुरुच आहे.
नागपूर हिंसाचारानंतर आज मुखमंत्री नागपुरात
औरंगजेबाची कबर हटविण्यावरुन झालेल्या आंदोलनानंतर दोन गटांत तेढ निर्माण होऊन जाळपोळ आणि पोलिसांवर दगडफेक करण्यात आली. या हिंसाचाराच्या घटनेनंतर आज (22 मार्च) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपुरात दाखल होणार आहे. नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतर गृहमंत्री फडणवीस हे पहिल्यांदाच नागपुरात येत आहे. पुढे आलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांनी नागपूरमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयात बोलावलेल्या या बैठकीत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून नागपूरमध्ये घडलेल्या हिंसाचाराचा आढावा घेतला जाणार आहे. सोबत हिंसाचारग्रस्त भागातील विद्यमान परिस्थितीची व उपायोजना संदर्भात मुख्यमंत्री चर्चा करणार असल्याचे सांगितलं जातंय.
हेही पहा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

