KKR vs RCB : एकेकाळच्या केकेआरच्या स्टारवर RCB विश्वास टाकणार, कोहलीसोबत मोठी जबाबदारी, कोलकाताची होमग्राऊंडवर नाकेबंदी करण्याचा बंगळुरुचा डाव
IPL 2025 : आयपीएलच्या 18 व्या हंगामातील पहिली लढत आज कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात होणार आहे.

कोलकाता : आयपीएलच्या 18 व्या हंगामातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये होणार आहे. केकेआरनं गेल्या वर्षीच्या 17 व्या हंगामामध्ये विजेतेपद पटकावलं होतं. त्यामुळं यंदा उद्घाटनाचा पहिला सामना केकेआरच्या होम ग्राऊंडवर म्हणजेच इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे. गतवर्षीच्या आयपीएलमध्ये सुरुवाती चाचपडत सुरुवात करणारा संघ म्हणजे आरसीबी होय. आरसीबीनं 2025 च्या आयपीएलसाठी मोठी तयारी केली आहे. आजच्या पहिल्या मॅचसाठी आरसीबीनं तगडं प्लॅनिंग केलं आहे. गेल्या वर्षीच्या आयपीएलमध्ये केकेआरला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या फिल सॉल्टवर आरसीबीनं मोठी जबाबदारी सोपवली आहे.
कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ नव्या कर्णधारासोबत मैदानात उतरणार आहेत. अजिंक्य रहाणे केकेआर तर आरसीबीचं नेतृत्व रजत पाटीदार करेल. केकेआरच्या होम ग्राऊंडवर लढत होणार असल्यानं त्यांच्याकडे अधिक आत्मविश्वास असेल. केकेआरकडून खेळणारे फिल सॉल्ट आणि सुयश शर्मा यावेळी आरसीबीकडून खेळणार आहेत. त्याचा फयदा आरसीबीला होऊ शकतो. तर, केकेआरला मात्र नुकसान सहन करावं लागेल.
आरसीबीनं या हंगामात तीन खेळाडूंना रिटेन केलं होतं. त्यामध्ये विराट कोहली, रजत पाटीदार आणि यश दयाल हे होते. मात्र, आरसीबीनं मेगा ऑक्शनमधून चांगली टीम बनवली. मात्र, आरसीबीकडे चांगला फिरकीपटू नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
केकेआरचा संघ मजबूत असून त्यांनी गतवर्षीचं विजेतेपद पटकावलं होत. केकेआरकेकेडे वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन यांच्यांसारखे फिरकीपटू आहेत. सुनील नरेन गोलंदाजीसह कोलकाताच्या डावाची सुरुवात देखील करु शकतो. याशिवाय केकेआरकडे अजिंक्य रहाणे आणि अंगकृष रघुवंशी यासारखे महत्त्वाचे खेळाडू देखील आहेत.
आरसीबीचा संभाव्य संघ :
फिल सॉल्ट(विकेटकीपर), विराट कोहली, रजत पाटीदार (कॅप्टन), लियाम लिविंगस्टोन, जॅकब बेथेल, टिम डेविड, कृणाल पांड्या, स्वप्निल सिंह, जोश हेझलवूड, यश दयाल, सुयश शर्मा, भुवनेश्वर कुमार
केकेआरचा संभाव्य संघ
सुनील नरेन, क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), अजिंक्य रहाणे, व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंह, आंद्रे रसेल, रमनदीप सिंह, हर्षित राणा, स्पेन्सर जॉनसन, वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा
दरम्यान, विराट कोहलीच्या आरसीबीला आतापर्यंत एकदाही आयपीएलचं विजेतेपद मिळालं नाही. 17 हंगाममध्ये आरसीबीला विजेतपदाजवळ जाऊन गवसणी घालण्यात अपयश आलं.
इतर बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

