Prashant Koratkar: प्रशांत कोरटकर 'मानलेला भाऊ'; फेसटाईमवरुन बड्या पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात; असीम सरोदेंचा खळबळजनक दावा
prashant koratkar in Dubai: प्रशांत कोरटकर हा कोलकातामार्गे दुबईला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नागपूर आणि कोल्हापूर पोलिसांच्या विश्वासर्हतेबाबत शंका उपस्थित

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर गेल्या 25 दिवसांपासून फरार आहे. यादरम्यान तो दुबईला पळून गेल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर इंद्रजीत सावंत (Indrajeet Sawant) यांचे वकील अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) हा 'पोलीस मित्र' आहे. त्याला कोणीतरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. नागपूर आणि कोल्हापूरमधील काही पोलीस अधिकारी त्याला मदत करत आहेत, असा दावा असीम सरोदे यांनी केला. ते शनिवार पुण्यात 'एबीपी माझा'शी बोलत होते.
यावेळी इंद्रजीत सावंत यांनी राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांविषयी गंभीर दावा केला. त्यांनी म्हटले की, पोलीस खात्यातील अंतर्गत माहितीनुसार, प्रशांत कोरटकर हा फेसटाईमवरुन सातत्याने पोलीस दलातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहे. तो कोणाचा तरी 'मानलेला भाऊ' आहे. तो कोणाचा मित्र असेल. पण कायदा सुव्यवस्था पाळताना हे संबंध आड येत असतील तर ही मोठी शोकांतिका आहे, असे असीम सरोदे यांनी म्हटले.
प्रशांत कोरटकर याच्यासोबत फोटो असणारे सगळेच पोलीस अधिकारी त्याला मदत करत नसतील. प्रशांत कोरटकरने सोशल मीडियावर फोटो टाकून अनेक पोलीस अधिकाऱ्यांशी जवळीक असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यापैकी सगळेच अधिकारी त्याच्या संपर्कात नसतील. पण काही पोलीस अधिकारी त्याच्या संपर्कात आहेत. त्यामुळेच प्रशांत कोरटकर याने त्याच्या मोबाईलमधील सर्व डेटा नष्ट करुन तो पत्नीच्या माध्यमातून पोलिसांकडे पाठवला. या मोबाईलमधील सगळा डेटा डिलिट करण्यात आला होता. त्यामुळे आम्ही पोलिसांत त्याच्याविरोधात तक्रार दिली आहे. प्रशांत कोरटकर याच्यावर पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करावा, अशी आमची मागणी असल्याचे असीम सरोदे यांनी म्हटले.
इंद्रजीत सावंत यांचा नंबर पोलीस अधिकाऱ्यानेच दिला
असीम सरोदे यांच्या दाव्यानुसार, कोल्हापुरातील एका पोलीस अधिकाऱ्याकडूनच प्रशांत कोरटकर याला इंद्रजीत सावंत यांचा नंबर मिळाला. हे संभाषण समोर येऊ नये म्हणून प्रशांत कोरटकर याने मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड नष्ट केला. त्याने मोबाईल फॉर्मेट केल्याने तपासात अडचणी येत आहेत. तसेच नागपूर पोलीस याप्रकरणाच्या तपासात कोल्हापूर पोलिसांना सहकार्य करत नाहीत, अशी माहिती आहे. नागपूर पोलिसांच्या या सहकार्य न करण्याच्या भूमिकेमागील कारण काय आहे, हे माहिती नाही, असे असीम सरोदे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

