Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा साप्ताहिक राशीभविष्य
Weekly Horoscope 24 To 30 March 2025 : नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य जाणून घ्या.

Weekly Horoscope 24 To 30 March 2025 : मार्च (March) महिन्याचा शेवटाचा आठवडा लवकरच सुरु होणार आहे. हा आठवडा अनेक राशींसाठी (Zodiac Signs) महत्त्वाचा असणार आहे. कारण या आठवड्यात अनेक मोठ्या ग्रहांच्या हालचाली होणार आहे. नवीन आठवडा तुमच्यासाठी कसा असेल? तुमचा व्यवसाय, करिअर, आरोग्य आणि लव्ह लाईफ या काळात कशी असेल? सर्व राशींचे साप्ताहिक राशीभविष्य (Weekly Horoscope) जाणून घ्या.
तूळ रास (Libra Weekly Horoscope)
तूळ राशीच्या लोकांसाठी मार्चचा शेवटचा आठवडा फार भाग्यशाली ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, जर तुम्हाला नवीन वाहन, किंवा एखादी प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर हा आठवडा तुमच्यासाठी चांगला असणार आहे. मात्र, या आठवड्यात तुम्हाला तुमच्या आरोग्यावर लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्याच्या बाबतीत कोणताच हलगर्जीपणा करु नका.
वृश्चिक रास (Scorpio Weekly Horoscope)
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी पुढचा आठवडा मध्यम फलदायी असणार आहे . या आठवड्यात तुमचा व्यवसाय चांगला सुरळीत सुरु राहील. मात्र, मनात तुमच्या अनेक विचार सुरु असतील. त्यामुळे तुम्हाला उत्साही वाटणार नाही. तसेच, भौतिक सुख-सुविधांचा आनंद घेता येईल. कुटुंबात तुमच्या आनंदी वातावरण निर्माण होईल. आरोग्याची काळजी घ्या.
धनु रास (Sagittarius Weekly Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे. या काळात तुमच्या मनात अनेक गोष्टींचे विचार सुरु असतील. काही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. काहींची उत्तरं मिळणार नाही. तसेच, जर तुम्हाला नवीन उद्योग सुरु करायचा असल्यास हा काळ तुमच्यासाठी योग्य आहे. विनाकारण पैसे खर्च करु नका.
मकर रास (Capricorn Weekly Horoscope)
मकर राशीच्या लोकांसाठी मार्चचा नवीन आठवडा सामान्य असणार आहे. या काळात सरकारी योजनांचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. तसेच, तुमची आर्थिक स्थितीदेखील पूर्वीपेक्षा चांगली असणार आहे. या काळात कोणतीच गुंतवणूक करु नका. त्यातून तुम्हाला लाभ मिळेलच असे नाही.
कुंभ रास (Aquarius Weekly Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांना आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घेण्याची गरज आहे. कुटुंबात थोडे वादविवाद होण्याची शक्यता आहे. तसेच, व्यवसायात काहीसा उतार-चढाव पाहायला मिळेल. आठवड्याच्या शेवटी मित्रांच्या माध्यमातून तुम्हाला एखादी शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तसेच, गणपतीची आरोधना करणं तुमच्यासाठी लाभदायक ठरेल.
मीन रास (Pisces Weekly Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा फार महत्त्वाचा असणार आहे. कारण याच आठवड्यात अनेक ग्रहांचं राशी संक्रमण मीन राशीतच होणार आहे. त्यामुळे तुमच्यासाठी हा काळ फार खास आहे. या दरम्यान उच्च अधिकाऱ्यांचा तुम्हाला चांगला लाभ घेता येईल. तसेच, नवीन वस्तूंची खरेदी करणं शुभकारक ठरेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

