Trigrahi Yog 2025 : मार्च महिन्याच्या शेवटी जुळून येणार 'त्रिग्रही योग'; या 3 राशींचे सुरु होणार 'अच्छे दिन', हाती घेतलेलं कार्य होणार पूर्ण
Trigrahi Yog 2025 : ज्योतिष शास्त्रानुसार, 29 मार्च रोजी कर्मफळदाता शनी आपल्या मूळ त्रिकोण राशीतून म्हणजेच कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करणार आहे.

Trigrahi Yog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, मार्च (March 2025) महिन्याचा शेवटचा आठवडा फार खास असणार आहे. कारण या महिन्याच्या शेवटी अनेक मोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. याचा देश-विदेशासह मानवी जीवनावर परिणाम होणार आहे. 29 मार्च रोजी मीन राशीत शनीसह अनेक ग्रह एकत्र येणार आहेत.
ज्योतिष शास्त्रानुसार, 29 मार्च रोजी कर्मफळदाता शनी आपल्या मूळ त्रिकोण राशीतून म्हणजेच कुंभ राशीतून निघून मीन राशीत प्रवेश करणार आहे. या ठिकाणी आधीपासूनच सूर्य, बुध, शुक्र आणि राहू ग्रह विराजमान आहेत. पण यापैकी शुक्र, राहू आणि मीनची युती फार महत्त्वाची आहे. यामुळे ग्रहांच्या युतीचा त्रिग्रही योग (Trigrahi Yog) जुळून येणार आहे. या राजयोगाचा कोणकोणत्या राशींवर परिणाम होणार ते जाणून घेऊयात.
वृषभ रास (Taurus Horoscope)
वृषभ राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग फार लाभदाक ठरणार आहे. या राशीच्या अकराव्या चरणात हा योग जुळून येणार आहे. त्यामुळे तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण करता येतील. समाजात तुमचा चांगला मान-सन्मान वाढलेला दिसेल. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण निर्माण झालेलं असेल. तसेच, प्रगतीचे चांगले योग निर्माण होणार आहेत. त्यामुळे मेहनत करत राहा.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या दुसऱ्या चरणात हा योग जुळून येणार आहे. त्यामुळे या राशीच्या जीवनात आनंद टिकून राहील. या कालावधीत तुम्हाला अनेक शुभवार्ता ऐकायला मिळतील. तसेच, या राशीच्या अंतिम चरणात शनीची साडेसाती असल्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होणार नाही. या कालावधीत तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल. नोकरीत जर तुम्हाला बदल करायचे असतील तर तुम्ही करु शकता.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी त्रिग्रही योग फार अनुकूल ठरणार आहे. या राशीच्या दहाव्या चरणात हा योग आहे. त्यामुळे अनेक राशींना चांगला लाभ मिळेल. तसेच, शनी ग्रह असल्यामुळे तुम्हाला चांगली शिस्त लागेल. यामुळे तुम्हाला प्रत्येक क्षेत्रात चांगलं यश मिळेल. तसेच, तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक गोष्टी घडतील. तुमच्या व्यवसायाचा अधिक मोठा विस्तार झालेला दिसेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :
Weekly Horoscope : मेष ते मीन, सर्व 12 राशींसाठी मार्च महिन्याचा शेवटचा आठवडा कसा असणार? वाचा लकी कलर, नंबर आणि टीप ऑफ द वीक
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

