Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस, माझ्या समाजाचा नुसता वापर केलाय : मनोज जरांगे
Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही, आणि ते नकोही, आम्हाला छत्रपतींचा हिंदुत्व मान्य असल्याचे देखील मनोज जरांगेंनी म्हटले आहे.

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis : छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) आणि छत्रपती संभाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Sambhaji Maharaj) आक्षेपार्ह विधान करून इतिहासकार इंद्रजीत सावंत (Indrajit Sawant) यांना जीवे मारण्याची धमकी देण्याचा आरोप असलेला नागपूर येथील पत्रकार प्रशांत कोरटकर (Prashant Koratkar) हा गेल्या 25 दिवसांपासून फरार आहे. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. प्रशांत कोरटकर सरकारचा सोयरा आहे. त्यामुळे तो सापडणार नाही. क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस आहे. माझ्या समाजाचा नुसता वापर केला, असे त्यांनी म्हटले आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले की, सरकारचा सोयरा आहे ना तो. त्याच्यामुळे तो सापडणार नाही. बाकीचे असते तर कशात तरी आतमध्ये टाकले असते. त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून जेवढ्या मकोकासारख्या कलमा आहेत, तेवढ्या कलमा त्याच्यावर टाकल्या पाहिजेत. तुम्हाला जर खरंच छत्रपतींचे प्रेम आहे ना, हिंदूतले काही जण रोज छत्रपतींचा अवमान करत आहे. त्यांनी फक्त आमचा वापर भांडण्यासाठी केलाय आणि त्यांच्या राजकीय पोळ्या भाजून घेतल्या आहेत. क्रूर आणि सूडभावनेने वागणारा माणूस म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस आहे. माझ्या समाजाचा नुसता वापर केला. तुमचं हिंदुत्व आम्हाला परवडत नाही, आणि ते नकोही, आम्हाला छत्रपतींचा हिंदुत्व मान्य आहे. आता फक्त निषेध करून चालणार नाही, महापुरुषांवर बोलणाऱ्यांना धडा शिकवावाच लागेल, असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केलाय.
त्यांनी आमचा वापर फक्त भांडणासाठीच केला
मनोज जरांगे पुढे म्हणाले की, प्रशांत कोरटकर पोलिसांना सापडत नाही, हे पोलिसांचे अपयश नाही, देवेंद्र फडणवीस घडवून आणत आहेत. त्यांचे सोयरे आहे, अपमान करणारे सगळे त्यांचे सोयरे आहेत. त्यांनी एक टोळी तयार केली आहे. ती छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि महापुरुषांचा अपमान करते. ते फक्त दाखवायला हिंदू दाखवतात. त्यांना बळ कोण देतं? त्यांना बोलायचं कोण सांगतं? यानंतर देवेंद्र फडणवीस दाटून मुटून बोलतील. देवेंद्र फडणवीस फक्त गोरगरिबाच्या लेकरांचं वाटोळं करू शकतात. त्यांनी काही जण फक्त जाणून-बुजून अवमान करण्यासाठी ठेवले आहेत. आता आम्हाला कळले की, मागील सत्तर वर्ष त्यांनी आमचा वापर फक्त भांडणासाठीच केला आहे. आम्ही जर हिंदू आहे तर आम्हाला मोठं कधी करणार आहे? हिंदू-हिंदू म्हणून आमचा घात किती दिवस करायचा आहे? धर्माचे रक्षण करणारी जात मराठा आहे, तुम्ही तिला संपवायला लागलात, अशी टीका त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

