(Source: ECI/ABP News/ABP Majha)
JP Atray Tournament 2021: जेपी अत्रे मेमोरियल क्रिकेट टूर्नामेन्टला आजपासून सुरुवात, 16 संघ एकमेकांना भिडणार
JP Atray Memorial Cricket Tournament : जेपी अत्रे मेमोरियल क्रिकेट टूर्नामेन्टमध्ये एकूण 16 संघ भाग घेत असून त्यांची विभागणी चार गटात केली आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 12 सप्टेंबरला होणार आहे.
चंदीगड : ऑल इंडिया जेपी अत्रे मेमोरियल क्रिकेट टूर्नामेन्टच्या 26 व्या स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना हा UTCA Chandigarh आणि CAG Delhi या दोन संघांच्या दरम्यान मोहाली येथील आयएस बिन्द्रा क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मांच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन पार पडलं आहे.
ऑल इंडिया जेपी अत्रे मेमोरियल क्रिकेट टूरनामेन्टचे आयोजन हे कोरोनाच्या नियमांचे पालन करुन आणि इतर सर्व सुरक्षा नियमांचे पालन करुन करण्यात येत असल्याचं आयोजकांच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे. आज उद्घाटनाच्या दिवशी पहिला सामना हा UTCA Chandigarh आणि CAG Delhi या दोन संघांच्या दरम्यान खेळवण्यात येत असून स्पर्धेचा अंतिम सामना हा 12 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.
जेपी अत्रे मेमोरियल क्रिकेट टूर्नामेन्टची सुरुवात 1992 साली झाली असून या वर्षी त्याची 26 वी टूर्नामेन्ट खेळवण्यात येत आहे. जेपी अत्रे मेमोरियल क्रिकेट टूर्नामेन्टमध्ये एकूण 16 संघ भाग घेत असून त्यांची विभागणी चार गटात केली आहे.
अ गट
बिहार इलेव्हन, पीसीए कोल्टस, प्लेयर्स इलेव्हन, एचपीसीए
गट ब
छत्तीसगढ स्टेट क्रिकेट संघ, पंजाब क्रिकेट क्लब, यूपी क्रिकेट असोसिएशन, आरबीआय मुंबई
गट क
डीडीसीए, मिनर्वा क्रिकेट अकादमी चंडीगढ, रनस्टार क्रिकेट क्लब दिल्ली, मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशन
गट ड
यूटीसीए चंडीगढ, कॅग दिल्ली, दिल्ली डेव्हलपमेन्ट कॅपिटल्स, बडोदा क्रिकेट असोसिएशन
संबंधित बातम्या :