Dale Steyn Retirement : साऊथ आफ्रिकेचा स्टार गोलंदाज डेल स्टेनचा क्रिकेटमधून संन्यास
स्टेन साऊथ आफ्रिकेचा स्टार गोलंदाज असून त्याने अनेक मॅच जिंकून विक्रम केले आहे. डेल स्टेनने साऊथ आफ्रिकेकडून 93 टेस्ट, 125 वनडे आणि 47 टी-20 सामने खेळले आहे.

मुंबई : साऊथ आफ्रिकेचा स्टार गोलंदाज डेल स्टेन यांने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला आहे. त्याच्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून त्याने क्रिकेटला रामराम करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घोंघावणारं डेल स्टेन नावाचं वादळ थांबलं आहे.
स्टेन साऊथ आफ्रिकेचा स्टार गोलंदाज असून त्याने अनेक मॅच जिंकून विक्रम केले आहे. डेल स्टेनने साऊथ आफ्रिकेकडून 93 टेस्ट, 125 वनडे आणि 47 टी-20 सामने खेळले आहे. टेस्ट मॅचमध्ये सर्वाधिक 439 विकेट घेण्याचा विक्रम डेल स्टेनच्या नावावर आहे. तसेच आयपीएलमध्ये देखील 95 मॅच खेळून डेल स्टेनने 97 विकेट घेतले आहे.
Announcement. pic.twitter.com/ZvOoeFkp8w
— Dale Steyn (@DaleSteyn62) August 31, 2021























