![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Ind vs Aus 4th Test : अखंड भारत शोकसागरात! मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने हातावर बांधली काळी पट्टी, मोठे कारण आले समोर
Former PM Manmohan Singh passes away : भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या गुरुवारी रात्री 92 व्या वर्षी निधन झाले.
![Ind vs Aus 4th Test : अखंड भारत शोकसागरात! मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने हातावर बांधली काळी पट्टी, मोठे कारण आले समोर Ind vs Aus Indian cricketers wear black armbands on Day 2 in Melbourne to honour former PM Manmohan Singh Cricket News Marathi Ind vs Aus 4th Test : अखंड भारत शोकसागरात! मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने हातावर बांधली काळी पट्टी, मोठे कारण आले समोर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/12/27/6be8385cda4015495b4d01b58b05db5017352610214331091_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Australia vs India, 4th Test : मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चौथा सामना खेळला जात आहे. यादरम्यान टीम इंडियाचे खेळाडू खेळाच्या दुसऱ्या दिवशी हातावर पट्टी बांधून बाहेर आले. हे पाहून भारतीय खेळाडूंनी हातावर काळी पट्टी का बांधली, असा प्रश्न सर्वांनाच पडला.
खरं तर, भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वयाच्या गुरुवारी रात्री 92 व्या वर्षी निधन झाले. यानंतर त्याच्या सन्मानार्थ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय खेळाडू हातावर काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरले.
मनमोहन सिंग यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, ते दीर्घकाळ आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. गुरुवारी नवी दिल्लीतील एम्समध्ये उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. रात्री 8 वाजता त्यांना रुग्णालयात आणण्यात आले, मात्र रात्री दहाच्या सुमारास मनमोहन सिंग यांनी जगाचा निरोप घेतल्याची बातमी आली. ते 2004 ते 2014 पर्यंत भारताचे पंतप्रधान होते. यानिमित्ताने माजी पंतप्रधानांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यासाठी भारतीय खेळाडूंनी हातावर काळ्या पट्ट्या बांधून त्यांना आदरांजली वाहिली.
Sad news of the passing of Dr. Manmohan Singh Ji. A visionary leader and a true statesman who worked tirelessly for India’s progress. His wisdom and humility will always be remembered. My heartfelt condolences to his loved ones. 🙏 #ManmohanSingh ji
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) December 26, 2024
मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर टीम इंडिया काळी पट्टी बांधून मैदानावर खेळण्यासाठी आली होती, त्याचवेळी क्रीडा जगतातील इतर अनेक माजी खेळाडूंनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे, ज्यात वीरेंद्र सेहवाग, हरभजन आणि युवराज सिंग यांच्या नावाचा समावेश आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत सेहवागने लिहिले, "माजी पंतप्रधान श्री मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल माझे मनःपूर्वक शोक." ओम शांती.
Saddened by the news of sudden demise of former Prime Minister, a thorough gentleman, and a visionary leader, Dr. Manmohan Singh Ji 💔💔What truly set him apart was his calm and steady leadership in times of crisis, his ability to navigate complex political landscapes, and his… pic.twitter.com/WKbjrnADJQ
— Harbhajan Turbanator (@harbhajan_singh) December 26, 2024
युवराज सिंगनेही दु:ख व्यक्त केले आहे आणि पोस्ट करत लिहिले की, 'डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख झाले. ते भारताच्या प्रगतीसाठी अथक परिश्रम करणारे एक दूरदर्शी नेते आणि खरे राजकारणी होते. त्यांची बुद्धी आणि नम्रता नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या प्रियजनांप्रती माझ्या संवेदना.'
My heartfelt condolences on the passing away of our former Prime Minister Shri Manmohan Singh ji.
— Virender Sehwag (@virendersehwag) December 26, 2024
Om Shanti 🙏🏼 pic.twitter.com/uPkmiCm5C4
बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर यजमान ऑस्ट्रेलियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना त्यांच्या पहिल्या डावात 6 विकेट गमावून 311 धावा केल्या होत्या. दुसऱ्या दिवसाच्या खेळात 6 विकेट्स गमावून 400 हून अधिक धावसंख्येवर नजर ठेवली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा स्टीव्ह स्मिथ 68 धावांवर खेळत होता तर कांगारू संघाचा कर्णधार पॅट कमिन्स 7 धावांवर खेळत होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)