(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BWF World Championships: भारताचे दोन पदकं निश्चित, Kidambi Srikanth आणि Lakshya Sen ची उपांत्य फेरीत धडक
BWF World Championships: जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांत (Kidambi Srikanth) आणि लक्ष्य सेन (Lakshya Sen) या जोडीनं डबल धमाका करून दाखवलाय.
BWF World Championships: जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांत (Kidambi Srikanth) आणि लक्ष्य सेन (Lakshya Sen) या जोडीनं डबल धमाका करून दाखवलाय. शुक्रवारी स्पेनच्या हुलेवा येथे झालेल्या क्वार्टर फायनलमध्ये किदांबी श्रीकांत आणि लक्ष्य सेन या दोघांनी सेमीफायनलमध्ये प्रवेश केलाय. ज्यामुळे भारताची दोन पदक निश्चित झाली आहेत. शनिवारी पहिल्या उपांत्य फेरीत श्रीकांत आणि लक्ष्य एकमेकांसमोर येणार आहे. यामुळं या दोन पदकांपैकी एक रौप्य पदक असल्याचंही निश्चित झालंय.
भारतासाठी स्पर्धेतील हा ऐतिहासिक दिवस ठरला आहे. या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत 12व्या मानांकित श्रीकांतनं 26 मिनिटात नेदरलँड्सच्या मार्क काल्झूवर 26 21-8, 21-7 फरकानं पराभूत केलं. याचबरोबर लक्ष्य सेननंही उपांत्यपूर्व फेरीत शानदार प्रदर्शन करून दाखवलंय. त्यानं उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या जुन पेंग झाओला 21-15, 15-21, 22-20 फरकानं पराभूत केलं. लक्ष्य सेन आणि जुन पेंग झाओ यांच्यात एक तास सात मिनिटे सामना सुरू होता.
दुसरीकडे महिला एकेरीत पीव्ही सिंधूकडून जेतेपदावर नाव कोरेल, अशी भारतीयांना आस होती. पण तिचा प्रवास उपांत्य फेरीतच संपुष्टात आलंय. शुक्रवारी कॅरोलिना मारिन स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात जागतिक नंबर वन ताई जू यिंगनं सिंधूला पराभूत केलं. 42 मिनिटांच्या लढतीत सिंधूला 17-21, 13-21 अशा फरकानं पराभव स्वीकारावा लागलाय. ताईविरुद्ध सिंधूचा हा सलग पाचवा पराभव स्वीकारावा लागलाय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
- Asian Champions Trophy 2021: पाकिस्तानचा धुव्वा उडवून भारताची उपांत्य फेरीत धडक; हरमनप्रीत-आकाशदीप ठरले विजयाचे हिरो
- PV Sindhu lost to Tai Tzu: पी. व्ही. सिंधूचे बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील आव्हान संपुष्टात
- Novak Djokovic : यंदाचा ITF World Champion नोवाक जोकोविच; सातव्यांदा मिळवला बहुमान