एक्स्प्लोर

Novak Djokovic : यंदाचा ITF World Champion नोवाक जोकोविच; सातव्यांदा मिळवला बहुमान

Novak Djokovic : टेनिस स्टार नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याच्यासाठी हे वर्ष उत्तम ठरलं. त्यानं यंदाच्या वर्षात ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बलडन ग्रँड स्लॅम टूर्नामेंट आपल्या नावे केला.

Novak Djokovic : टेनिस स्टार नोवाक जोकोविच (Novak Djokovic) यानं एक नवा विक्रम आपल्या नावे केला आहे. सात वेळा आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियन बनणारा जोकोविच हा पहिला खेळाडू ठरला आहे. त्यानं पीट सम्प्रास यांना मागे टाकत हा विक्रम आपल्या नावे केला आहे. जोकोविचच्या आधी पीट सम्प्रास (Pete Sampras) यांनी सहा वेळा आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियनचा बहुमान मिळवला होता. दरम्यान, इंटरनेशनल टेनिस फेडरेशननं (आयटीएफ) ने गुरुवारी याची घोषणा केली. यासंदर्भात इंटरनेशनल टेनिस फेडरेशनच्या ट्विटर हँडलवरुन ट्वीटही करण्यात आलं आहे. 

नोवाक जोकोविचसाठी हे वर्ष उत्तम ठरलं. त्यानं यंदाच्या वर्षात ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बलडन ग्रँड स्लॅम टूर्नामेंट आपल्या नावे केला. तर यूएस ओपनमध्ये जोकोविच उपविजेता ठरला. तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये जोकोविच सेमीफायनलपर्यंत पोहोचला होता. जर जोकोविचला यूएस ओपन आणि टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी खेळी करता आली असती, तर त्यानं गोल्डन स्लॅम आपल्या नावे केलं असतं. आपल्या दमदार खेळीच्या जोरावर जोकोविच सध्या रॅकिंगमध्ये टॉपवर आहे. टॉप रॅकिंगसह त्यानं सातव्यांदा आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियनचा किताब आपल्या नावे केला आहे. जोकोविचपूर्वी अमेरिकेचे माजी दिग्गज टेनिसपटू पीट सम्प्रास यांनी सहा वेळा आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियनचा किताब पटकावला होता. 

एश बर्टीला दुसऱ्यांदा आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियनचा किताब

यंदाच्या वर्षात आपला पहिला विम्बलडन किताब जिंकणारी महिला टेनिसपटू एश बर्टीनंदेखील रॅकिंगमध्ये अव्वल स्थान पटकावलं आहे. अशातच तिनं दुसऱ्यांदा आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियनचा किताब पटकावला आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्येही बर्टीनं कांस्य पदक पटकावलं होतं. यापूर्वी 2019 मध्ये बार्टीला आयटीएफ वर्ल्ड चॅम्पियनचा बुहमान मिळाला होता. 

पुढच्या वर्षी सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकणारा खेळाडू ठरु शकतो जोकोविच 

जोकोविचनं आपल्या करिअरमध्ये एकूण 20 ग्रँड स्लॅम किताब पटकावले आहेत. जोकोविचनं ग्रँड स्लॅमचा किताब पटकावण्याच्या बाबतीत टेनिसस्टार राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांच्याशी बरोबरी केली आहे. नोवाकचा सध्याचा फॉर्म पाहता, तो पुढच्या महिन्यात होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनचा किताबही आपल्या नावे करण्याच्या शक्यता वर्तवण्यात येत आहेत. जर नोवाकनं असं केलं, तर राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांना मागे टाकत तो सर्वाधिक ग्रँड स्लॅम जिंकण्याचा बहुमान तो मिळवू शकतो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

IND vs SL 1st Test DAY-3 Live : गिलचा सुपरमॅन अवतार! एका हाताने घेतला भन्नाट झेल, श्रीलंकेचा डाव संकटात; स्कोअर 59/4, जाणून घ्या Live अपडेट्स
गिलचा सुपरमॅन अवतार! एका हाताने घेतला भन्नाट झेल, श्रीलंकेचा डाव संकटात; स्कोअर 59/4, जाणून घ्या Live अपडेट्स
LIVE सामन्यात धक्कादायक क्षण! स्टार खेळाडू अचानक जमिनीवर पडला, सगळेच घाबरले! डॉक्टरांची मैदानात धावपळ, VIDEO
LIVE सामन्यात धक्कादायक क्षण! स्टार खेळाडू अचानक जमिनीवर पडला, सगळेच घाबरले! डॉक्टरांची मैदानात धावपळ, VIDEO
Ind vs Sl 1st Test Day-3 : तिसऱ्या दिवशी फक्त 2 धावा अन् 462 वर टीम इंडिया ऑलआऊट; मग सिराजने श्रीलंकेला दुसऱ्याच चेंडूवर दिला मोठा धक्का, पाहा VIDEO
तिसऱ्या दिवशी फक्त 2 धावा अन् 462 वर टीम इंडिया ऑलआऊट; मग सिराजने श्रीलंकेला दुसऱ्याच चेंडूवर दिला मोठा धक्का, पाहा VIDEO
The Hundred 2026 : बटलरच्या नेतृत्वात संजय गोयंकांच्या टीमने अखेर ट्रॉफी जिंकली; मैदानात जोरदार सेलिब्रेशन, टिम सिफर्टने धू धू धुतलं!
बटलरच्या नेतृत्वात संजय गोयंकांच्या टीमने अखेर ट्रॉफी जिंकली; मैदानात जोरदार सेलिब्रेशन, टिम सिफर्टने धू धू धुतलं!

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
पहाटेच्या साखरझोपेतच हाॅटेलमधील अग्नितांडवात 7 जण जिवंत जळाले, अनेकजण होरपळले, एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे आगीचा भडका
Mumbai Railway Local Train: मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
मुंबईच्या 'या' चार रेल्वे स्थानकांवरील वॉटर कूलरच्या पाण्यात आढळला भयानक जिवाणू, किडनीवरही परिणाम होण्याचा धोका
Mukesh Khanna Demands To Remove Jana Gana Mana: 'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
'राष्ट्रगीताचा दर्जा 'वंदे मातरम्'ला द्या...', 'शक्तिमान' फेम मुकेश खन्ना यांची 'जन गण मन' हटवण्याची मागणी
Embed widget