Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात किमान तापमान १० अंशांखाली जाण्याचा अंदाज आहे.उत्तरेकडून वारे वाहण्याची शक्यता असल्याने थंडीचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात आलंय.

Maharashtra Weather Update: राज्यात यंदा सततच्या पावसाला कंटाळलेल्या नागरिकांना आता गारठा जाणवू लागलाय. उत्तर महाराष्ट्राला चांगलीच हुडहुडी भरली आहे. येत्या आठवड्यापासून उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही गारठा वाढू लागल्यानं वळचणीला ठेवलेल्या स्वेटर, कानटोप्या आता बाहेर काढल्या जाऊ लागल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात थंडीचा जोर आणखी वाढणार असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान १० अंशांखाली जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय.
नोव्हेंबरच्या शेवटी तापमान घसरणार
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यात यंदा कडाक्याची थंडी राहणार असून नोव्हेंबरच्या शेवटी आणि डिसेंबरच्या सुरुवातीला महाराष्ट्रातील तापमान कमी होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात किमान तापमान १० अंशांखाली जाण्याचा अंदाज आहे.उत्तरेकडून वारे वाहण्याची शक्यता असल्याने थंडीचा जोर वाढणार असल्याचं सांगण्यात आलंय.
आयएमडीचा विभागनिहाय अंदाज काय?
प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुढील चार ते पाच दिवस तापमानात फारसा फरक दिसणार नसला तरी येत्या 24 तासानंतर 2 ते 3 अंशाने तापमान घसरण्याची शक्यता आहे. कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील तीन ते चार दिवसात हळूहळू तापमान घटणार असल्याचं प्रादेशिक हवामान केंद्र मुंबईने सांगितलं आहे. पुढील पाच दिवसात विदर्भात तापमानात फारसा फरक नाही. दरम्यान संपूर्ण राज्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार आहे.

कोणत्या जिल्ह्यात किती तापमान?
राज्यात उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढला असून आकार मराठवाडा व मध्य महाराष्ट्रातही गारठा वाढत आहे. दरम्यान सोमवारी किमान तापमान 26 ते 30 डिग्री सेल्सिअस पर्यंत गेले होते. येत्या तीन ते चार दिवसात तापमानात घट होणार असून नोव्हेंबरच्या शेवटी डिसेंबरच्या सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये महाराष्ट्रात किमान तापमान 10° पेक्षा ही खाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील परभणीत आज सर्वात कमी तापमानाची नोंद झाली असून 11.9° c ची नोंद झाली आहे. बहुतांश ठिकाणी तापमान कमी होतानाचे चित्र आहे.
Before You Go
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
महत्त्वाच्या बातम्या





















