(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Gokul Milk : निवडणूक निकाल लागताच इकडं सीएनजी गॅस दर भडकला तिकडं गोकुळसह पश्चिम महाराष्ट्रात दूध संघांकडून गाय दूध खरेदी दरात 3 रुपयांची कपात!
राज्य सरकारकडून ऑक्टोबर 2024 पासून गाय दूध खरेदीचा 3.5 फॅट व 8.5 एसएनएफसाठी प्रतिलिटर 28 रुपये निश्चित केला आहे. महाराष्ट्रात इतर संघ 27 ते 28 रुपये दराने गाय दूध खरेदी करीत आहेत.
Cow Milk Purchase Price Reduce : निवडणुकीची मतमोजणी सुरु असताना सीएनजी दरात वाढ करण्यात आल्यानंतर आता 'गोकुळ'कडून गायीच्या दूध खरेदी दरात तब्बल 3 रुपयांची कपात करण्यात आली आहे. गोकुळकडून दूध उत्पादकाकडून गायीच्या दुधाची 33 रुपयांनी खरेदी केली जात होती. आता गोकुळ गायीचे दूध प्रतिलीटर 30 रुपयांनी खरेदी करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच दूध संघांनी खरेदी दरात कपात केली आहे.
निवडणूक पार पडताच गोकुळचा शेतकऱ्यांना धक्का
दरम्यान, पश्चिम महाराष्ट्रातील गोकुळ, वारणा, राजारामबापू या सहकारी संघासह पश्चिम महाराष्ट्रातील खासगी दूध संघांनी सुद्धा गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपयांची कपात केली आहे. 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ दूध 30 रुपये लिटरने खरेदी केलं जाईल. थेट तीन रुपयांना कात्री लावल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना तगडा झटका बसला आहे. गाय दूध पावडर, लोणी, दुधाचे बाजारातील विक्रीचे दर आणि खरेदी दर यामध्ये तफावत राहत आहे.
सरकारकडून 28 रुपये दर निश्चित
राज्य सरकारकडून ऑक्टोबर 2024 पासून गाय दूध खरेदीचा 3.5 फॅट व 8.5 एसएनएफसाठी प्रतिलिटर 28 रुपये निश्चित केला आहे. महाराष्ट्रात इतर संघ 27 ते 28 रुपये दराने गाय दूध खरेदी करीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील दूध संघ 33 रुपये अधिक अंतिम दूध दर फरक असा जवळपास गाय दूध खरेदी दर सहा रुपये जास्त आहे.
सीएनजी गॅस दरातही भडका
दुसरीकडे, निवडणूक निकाल लागताच पुणे, मुंबईत कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) दरात वाढ करण्यात आली आहे. शुक्रवारपासून मुंबईत सीएनजी गॅस 77 रुपये किलो दराने विकला जात आहे. महानगर गॅस लिमिटेड (MGL) ने मुंबई आणि आसपासच्या भागात तात्काळ प्रभावाने CNG च्या किमतीत प्रति किलो 2 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. यानंतर आता मुंबई महानगर प्रदेशात सीएनजीची किंमत 75 रुपयांवरून 77 रुपये किलो झाली आहे. 22 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून नवीन किंमत लागू झाली आहे. सीएनजीच्या किमतीत वाढ नैसर्गिक वायू खरेदी आणि इतर परिचालन खर्चांसह वाढत्या इनपुट खर्चामुळे झाली आहे. महानगर गॅसने (MGL) जुलै 2024 मध्ये CNG च्या किमतीत 1.50 रुपयांनी वाढ केली होती. त्यानंतर सीएनजीची किंमत 75 रुपये किलो झाली. सीएनजीच्या किमतीत वाढ झाल्यामुळे मुंबई आणि शेजारच्या ठाणे जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होईल आणि परिचालन खर्च वाढेल. सीएनजी कार आणि टॅक्सी व्यतिरिक्त, सीएनजीवर अवलंबून असलेल्या स्कूल बस आणि कॅब ऑपरेटर्सचा नफाही कमी होईल.
इतर महत्वाच्या बातम्या