एक्स्प्लोर
Shreyas Iyer : संघाची घोषणा! श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची धुरा, 'या' खेळाडूंना मिळाली संधी
Mumbai in Syed Mushtaq Ali Trophy : 23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबई क्रिकेट संघाने श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे.

Shreyas Iyer captain Mumbai Syed Mushtaq Ali Trophy
1/8

23 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर दरम्यान खेळल्या जाणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी मुंबई क्रिकेट संघाने श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ यांचाही संघात समावेश करण्यात आला आहे.
2/8

रहाणे रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईचे नेतृत्व करत आहे, ज्याचा पूर्वार्ध नुकताच संपला. तसेच पुनरागमन करणारा फलंदाज सिद्धेश लाडचाही संघात समावेश आहे. रणजी ट्रॉफीच्या या मोसमात अय्यर चांगली कामगिरी करत असून त्याला टीम इंडियात पुनरागमन करायचे आहे.
3/8

सध्याच्या रणजी ट्रॉफीमध्ये श्रेयस अय्यरने 90.40 च्या सरासरीने 452 धावा केल्या आहेत ज्यात दोन शतकांचा समावेश आहे.
4/8

श्रेयस अय्यरने ओडिशाविरुद्ध 233 धावांची (228 चेंडू, 24 चौकार, नऊ षटकार) जलद खेळी खेळली आणि त्यानंतर 142 धावा (190 चेंडू, 12 चौकार, चार षटकार) करत मुंबईच्या सलग दोन विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
5/8

श्रेयस अय्यरने 2023 साली टी-20 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघासाठी शेवटचा सामना खेळला होता. तो कसोटी संघातूनही बाहेर आहे. आतापर्यंत त्याने भारतासाठी 14 कसोटी, 62 एकदिवसीय आणि 51 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
6/8

या संघात 25 वर्षीय पृथ्वी शॉचा समावेश आहे, त्याला फिटनेस आणि शिस्तीच्या मुद्द्यांमुळे रणजी संघातून वगळण्यात आले होते. तो पुन्हा लयीत येण्यासाठीही उत्सुक असेल.
7/8

फिरकी गोलंदाजी अष्टपैलू तनुष कोटियन, जो ऑस्ट्रेलियातील भारत अ संघाच्या अनधिकृत कसोटीचा भाग होता, त्याचाही अनुभवी अष्टपैलू शार्दुल ठाकूरसह मुंबई संघात समावेश करण्यात आला आहे.
8/8

मुंबई संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, आंग्रिश रघुवंशी, जय बिस्ता, अजिंक्य रहाणे, सिद्धेश लाड, सुर्यांश शेडगे, साईराज पाटील, हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), आकाश आनंद (यष्टीरक्षक), शम्स मुलानी, हिमांशू सिंह, तनेश कुमार सिंह, तनमुष सिंह , मोहित अवस्थी, रॉयस्टन डायस, जुनैद खान.
Published at : 17 Nov 2024 09:12 PM (IST)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
पुणे
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
