एक्स्प्लोर

फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप

EVM Scam : मनसे उमेदवाराने ईव्हीएममध्ये फ्रॉड झाल्याचा आरोप केलाय.

EVM Scam : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने एकतर्फी विजय मिळवलाय. महायुतीने विधानसभा निवडणुकीत 236 जागा जिंकल्या आहेत, तर महाविकास आघाडीला केवळ 49 जागांवर समाधान मानावे लागले आहे. भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्या आहेत. शिंदेंच्या शिवसेनेने 57 जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने 41 जागा जिंकत निवडणूक एकतर्फी केली आहे. दरम्यान,मनसेच्या एका उमेदवाराने ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला आहे. "फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का?" असा सवाल करत ईव्हीएममध्ये फ्रॉड झाल्याचे म्हटले आहे. 

दोन-दोन दिवस झाल्यानंतर चार्जींग 99 टक्के कसं काय असू शकतं?

मनसे दहिसर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश येरुणकर म्हणाले,काही मशीनचे चार्जिंग 99 टक्के होतं, काही मशीनचं चार्जिंग 70 टक्के तर काहींचं 60 टक्के होतं. दोन-दोन दिवस झाल्यानंतर चार्जींग 99 टक्के कसं काय असू शकतं? मी जिथे राहतो...माझ्या घरात चार मतं आहेत. माझी आई, मुलगी, पत्नी आणि स्वत: मी एवढं जण असून देखील मला चार मतं कशी? माझ्या आईने, मुलीने किंवा पत्नीने मला मतदान केलं नाही का? अशा प्रकारचा सर्व घोळ आतमध्ये आहे. 

गेले अनेक वर्ष आम्ही राजकारणात काम करतोय. या मतदारसंघात प्रत्येक जण सांगतोय की, आम्ही विद्यमान आमदाराला कंटाळलोय. ते आम्हाला नको आहेत. आम्हाला बदल करायचाय. आमच्या कार्यकर्त्यांची मतं आम्हाला मिळाली नाहीत काय?  असा सवालही राजेश येरुणकर म्हणाले. 

राजेश येरुणकर यांच्या सहकारी म्हणाल्या, निवडणुका बंद करुन टाका दरवर्षी असं होणार असेल तर अजिबात गरज नाहीये. मागील पाच वर्षांपूर्वी आमचे 5 मशीन फ्रॉड निघाले होते. यांच्याकडचे नंबर वेगळे आणि पोलिंग एजंटचे नंबर वेगळे होते. तरीही हे लोक म्हणतात. प्रोव्हिजन आहे, असंच करावे लागले. आता आम्ही आक्षेप घेतला तर अधिकारी ऐकून घ्यायला तयार नाहीत. असं होतं असेल तर निवडणूक रद्द करा. गणपत पाटील नगरमध्ये अजिबात कामं झालेली नाहीत. तिथे त्यांना लीड मिळतो? 163 मध्ये केवळ आमच्या उमेदवाराला फक्त दोनच मतदान पडलं. तीस वर्ष राजकारणात आहोत. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Eknath Shinde : निवडणूक निकालानंतर आमदार हैदराबादला, एकनाथ शिंदेंनी प्रायव्हेज जेट पाठवून तत्काळ मुंबईला आणला

Gunaratna Sadavarte : देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत ही माझी भावना, गुणरत्न सदावर्तेंची भाजपकडे मागणी; जरांगेंना इशारा देत म्हणाले...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kunal Kamra : शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं, Murji Patel पोलीस स्टेशनमध्येAnandache Paan : संभाजीराजांचं आग्रा-राजगड प्रवास वर्णन;साधूपुत्र कादंबरी उलगडताना लेखक नितीन थोरातNagpur Violence Update : नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी हटवलीDevendra Fadnavis Pune Speech : गटशेतीच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करु शकतो

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kunal Kamra : एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
एकनाथ शिंदेंविरोधात कॉमेडियन कुणाल कामराचे व्यंगात्मक गाणं; शिंदे गटाकडून तक्रार दाखल
Pakistan : YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
YouTuber म्हणाला, पाकिस्तानमध्ये औषधेही भारतातून येतात, पाकचे लोक म्हणाले, नमाज अदा करा, अल्लाहताला...
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
पती आणि प्रियकरासह दारू पार्टी अन् तिघेही पोहोचले एकाच बेडरूममध्ये; माजी मंत्र्याची सून अशा अवस्थेत सापडली की कोणी अंदाजही केला नव्हता!
Nashik News : चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
चार वर्षीय चिमुकली बादलीत बुडाली, नाका-तोंडात पाणी गेल्यानं दुर्दैवी अंत; नाशिकमध्ये हळहळ
Nashik Guardian Minister : नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
नाशिक पालकमंत्रिपदाच्या तिढ्यात मिठाचा खडा नको म्हणून मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार पद? फडणवीसांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
गर्लंफ्रेडला वारंवार भेटायला जाताच गल्लीतील तरुणांचा विरोध, बाॅयफ्रेंडने त्याच गल्लीत तीन सेकंदात तीन बाॅम्ब फेकले! 12 देशी बनावटीचे बाॅम्ब जप्त!
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Stock Market : सेन्सेक्सवरील टॉप 10 पैकी 9 कंपन्यांचं बाजारमूल्य 300000 कोटींनी वाढलं, सर्वाधिक फायदा कुणाला?
Professor Dancing Viral Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Video : प्रोफेसरचा जबरा डान्स पाहून विद्यार्थ्यांची बोटे तोंडात, संपूर्ण कॅम्पस टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजला
Embed widget