Asian Champions Trophy 2021: पाकिस्तानचा धुव्वा उडवून भारताची उपांत्य फेरीत धडक; हरमनप्रीत-आकाशदीप ठरले विजयाचे हिरो
Asian Champions Trophy 2021: ढाका येथील या सामन्यात भारतीय संघ सुरुवातीपासूनच आक्रमक खेळताना दिसला आणि त्याचा फायदाही झालाय.
Asian Champions Trophy 2021: आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2021 च्या साखळी सामन्यात भारतीय हॉकी संघानं (Indian Hockey Team) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (IND Vs PAK) धुव्वा उडवून उपांत्य फेरीत धडक दिलीय. भारताकडून हरमनप्रीत सिंह (Harmanpreet Singh) आणि आकाशदीप सिंह (Akashdeep Singh) विजयाचे हिरो ठरले आहेत. या सामन्यात भारतीय हॉकी संघानं अप्रतिम कामगिरी करत पाकिस्तानचा 3-1 असा पराभव केलाय. ढाका येथील या सामन्यात भारतीय संघ सुरुवातीपासूनच आक्रमक खेळताना दिसला आणि त्याचा फायदाही संघाला झालाय.
हरमनप्रीत सिंहनं पहिल्या क्वार्टरमध्ये पेनल्टी कॉर्नरद्वारे गोल करीत भारताला आघाडी मिळवून दिली. मात्र, सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला अर्शदीप सिंगला चुकीच्या टॅकलमुळे 2 मिनिटे मैदान सोडावं लागलं होतं. यामुळं दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारताला 2 मिनिटे 10 खेळाडूंसह खेळावं लागलं. याचा फायदा घेण्यासाठी पाकिस्ताननं पलटवार केला. पण भारतीय खेळाडूंनी त्यांना रोखलं. पहिल्या हाफपर्यंत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली.
तिसऱ्या क्वार्टरमध्येही भारताचं वर्चस्व पाहायला मिळालं. दरम्यान, 41व्या मिनिटाला पाकिस्तानच्या हमामुद्दीनला अंपायरनं ग्रीन कार्ड दाखवलं. ज्यामुळं त्याला दोन मिनिटासाठी मैदानाबाहेर जावं लागलं. याचा भारताला फायदा झाला. आकाशदीप सिंहनं 42व्या मिनिटाला रिव्हर्स फ्लिकद्वारे गोल केला. मात्र, तिसऱ्या क्वार्टरच्या शेवटच्या काही मिनिटांत पाकिस्ताननं गोल करून पुनरागमन केलं. तिसऱ्या हाफच्या अखेरीस भारत 2-1 च्या फरकानं आघाडीवर होता.
चौथ्या क्वार्टरमध्ये पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नरद्वारे बरोबरी साधण्याची संधी मिळाली. सामन्यादरम्यान चेंडू पाकिस्तानी खेळाडूच्या पायाला लागल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसत होते. परंतु, चेंडू भारतीय खेळाडूच्या पायाला लागल्याचं मैदानावरील पंचांना वाटलं. त्यामुळंच पंचांनी पाकिस्तानला पेनल्टी कॉर्नर मिळाला. परंतु, कर्णधार मनप्रीत सिंहच्या रेफरलमुळं पंचांना निर्णय बदलावा लागला. यानंतर भारतानं आक्रमक हॉकी खेळण्यास सुरुवात केली आणि 5व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंहनं पेनल्टी कॉर्नरवर भारतासाठी तिसरा गोल केला. हा त्याचा सामन्यातील दुसरा गोल ठरला. यानंतर पाकिस्ताननं पुनरागमन करण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्याला यश मिळाले नाही.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha