Watch : 'मारो मुझे मारो' मीम व्हिडीओमधला साकिब पाकिस्तानच्या पराभवानंतर दु:खी, सलमानच्या गाण्यावर शेअर केला मजेशीर VIDEO
PAK vs SL: आशिया कप 2022 मध्ये पाकिस्तान संघाला फायनलमध्ये श्रीलंकेनं 23 धावांनी मात दिली. ज्यामुळे पाकिस्तानचं आशिया कप जिंकण्याचं स्वप्न अधुरं राहिलं, ज्यामुळे त्यांचे चाहते कमालीचे नाराज झाले आहेत.
Momin Saqib Meme : आजकाल सोशल मीडिया (Social Media) ओपन केल्यावर विविध मजेशीर मीम्स दिसत असतात. कोणतीही घटना घडली की त्याचे मीम्स व्हायरल (Viral Memes) होऊ लागतात. त्यात क्रिकेट जगतात 'ओ भाई.. मारो मुझे मारो' या व्हायरल व्हिडिओबद्दल जवळपास (Meme Video) सर्वांनाच माहित आहे. हे शब्द दररोज सोशल मीडियावर कोणत्या न कोणत्या मीममध्ये पाहायला मिळतात. तर हा मूळचा व्हिडीओ भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्यानंतर पाकिस्तानच्य़ा पराभवानंतर व्हायरल झाला होता. व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती मोमीन साकिब (Momin Saqib) हा असून तो पाकिस्तान क्रिकेट संघाचा एक मोठा चाहता आहे. आता आशिया कप फायलनमध्ये पाकिस्तानचा श्रीलंकेकडून पराभव झाल्यावर पुन्हा एकदा मोमीनने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंका संघाने फायनलमध्ये त्यांनी पाकिस्तान संघाला (Pakistan vs Sri Lanka) 23 धावांनी मात देत चषक जिंकला आहे. दरम्यान या पराभवानंतर पाकिस्तानी चाहते दु:खी झाले असताना मोमीनने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये मोमीन दु:खी असल्यामुळे एका सॅड गाण्यावर अॅक्ट करताना दिसत आहे. हे गाणं म्हणजे प्रसिद्ध बॉलीवुड सिनेमा तेरे नाममधील गाणं असून सलमानप्रमाणे मोमीन या गाण्यात अॅक्टिंग करताना दिसत आहे. पाकिस्तानचा संघ फायनलपर्यंत पोहचल्यानंतर अखेर फायनलमध्ये श्रीलंकेकडून पराभूत झाल्यानंतर चाहते कमालीचे निराश झाले. त्याचवेळी तेथे उपस्थित मोमीनही दु:खी झाल्यामुळे अशाप्रकारे व्हिडीओ पोस्ट करत आहे, विशेष म्हणजे सॅड असतानाही तो प्रत्येकाला हसवू शकत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
कोहलीसोबत पंजाबीमध्ये बातचीत
मोमीन कायमच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर तो कायमच एकापेक्षा एक मजेशीर व्हिडिओ पोस्ट करत असतो. रविवारी भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्यादरम्यानही साकिबने अनेक मजेदार व्हिडिओ शेअर केले होते. यातील एका व्हिडिओमध्ये तो विराट कोहलीला भेटतानाही दिसला होता. ज्यात कोहली आणि साकिब पंजाबीमध्ये मजेदार संवाद साधताना दिसले होते.
A great sportsman and a humble personality. The one and only @imVkohli 🙌🏻 Good to see him back in form!
— Momin Saqib (@mominsaqib) August 28, 2022
What a game tonight! 🔥
Shall see you in the Final! 🏏#AsiaCup2022 #MominSaqib #ViratKohli #Kohli #INDvsPAK2022 #PakvInd #Dubai #UAE @DubaiStadium @ICCAcademy pic.twitter.com/gx8dDalHdv
हे देखील वाचा-