Dancer Gautami Patil: गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गौतमी पाटीलनं दिली गूड न्यूज; म्हणाली, "माझी इच्छापूर्ती..."
Gautami Patil On Krishna Murari Album: आपल्या डान्स स्टेप्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या आणि कातील अदांनी चाहत्यांना वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलनं गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर तिच्या चाहत्यांना गूड न्यूज दिली आहे.

Gautami Patil On Krishna Murari Album: सबसे कातील गौतमी पाटील (Gautami Patil), या वाक्यानं अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलंय. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की, तिथे तिची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड उडते आणि त्यासोबतच वाद होतातच. तसं गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि वाद हे समीकरणंच झालंय. पण, असं असूनही गौतमीची क्रेझ काही कमी होण्याचं नाव घेत नाही. गौतमी नेहमीच आपल्या कातील अदांनी चाहत्यांच्या काळजाचा ठाव घेते. अशातच आता फिल्म इंडस्ट्रीमध्येही गौतमीनं पाऊल ठेवलं आहे. काही दिवसांपूर्वी गौतमीचा चित्रपट आला होता. अशातच आता गुढीपाडव्याच्या (Gudi Padwa) मुहूर्तावर गौतमीनं चाहत्यांना एक गूड न्यूज दिली आहे.
आपल्या डान्स स्टेप्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या आणि कातील अदांनी चाहत्यांना वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलनं गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर तिच्या एका नव्या गाण्याचं पोस्टर सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलं आहे. अजून गौतमीचं नवकोरं गाणं रिलीज झालं नसून गाण्याचा टीझर लवकरच रिलीज होणार असल्याची माहिती मिळत आहे.


आपल्या नृत्य कौशल्यानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी नृत्यांगणा म्हणजे गौतमी पाटील. गुढीपाडवा आणि नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर गौतमी पाटीलनं साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत 'कृष्ण मुरारी' या गाण्याचं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर (Social Media) शेअर केलं आहे. या गाण्याचे निर्माते संदेश गाडेकर आणि सुरेश गाडेकर हे आहेत. गायिका गायत्री शेलार हिनं हे गाणं गायलं असून विशाल शेलार (Vishal Shelar) यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. मनीष महाजन या गाण्याचे दिग्दर्शक आहे. तर या गाण्याचं संगीत आयोजन आदित्य पाटेकर आणि करण वावरे यांनी केलं आहे. या गाण्याची उत्सुकता गौतमीच्या सर्व चाहत्यांना लागली आहे.
गौतमी पाटील तिच्या पहिल्या गवळण गीताविषयी चाहत्यांना माहिती दिली आहे. गौतमी पाटील म्हणाली की, "लोकसंगीतातील गवळण हा नृत्यप्रकार मला फार आवडतो. माझी खूप दिवसांपासून गवळण करण्याची इच्छा होती. साईरत्न एंटरटेनमेंट प्रस्तुत 'कृष्ण मुरारी' या गाण्यामुळे माझी इच्छापूर्ती झाली. मी सोशल मीडियावर या गाण्याच पोस्टर नुकतच शेअर केल आहे. प्रेक्षकांचा या गाण्याच्या पोस्टरला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. या गाण्याचा टीझर 3 एप्रिलला प्रदर्शित होईल."
महत्त्वाच्या इतर बातम्या :























