Carlos Alcaraz : स्पेनच्या कार्लोस अल्कारेजची कमाल, अवघ्या 19 व्या वर्षी युएस ओपनच्या जेतेपदाला गवसणी!
US Open 2022 : स्पेनच्या कार्लोस अल्कारेज याने युएस ओपन 2022 च्या अंतिम सामन्यात नॉर्वेच्या कॅस्पर रुड याला मात दिली आहे. यासोबतच तो जगातील नंबर एकचा खेळाडू देखील झाला असून 19 वर्षाच्या वयातच त्याने ही कामगिरी केली आहे.
Carlos Alcaraz Wins US Open 2022 : स्पेनच्या कार्लोस अल्कारेज याने (Carlos Alcaraz) याने आपल्या कारकिर्दीतील पहिले ग्रँडस्लॅम युएस ओपन 2022 च्या रुपात जिंकले आहे. अल्कारेजने यूएस ओपनच्या फायनलमध्ये नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा 6-4, 2-6, 7-6(1) आणि 6-3 च्या फरकाने पराभव केला आहे. या विजयासोबतच अल्कारेज असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स म्हणजेच एटीपी (ATP Ranking) क्रमवारीतही प्रथम क्रमांकावर पोहोचला आहे. एटीपी रँकिंगच्या 39 वर्षांच्या इतिहासात, कार्लोस जगातील नंबर-1 बनणारा सर्वात तरुण खेळाडू झाला आहे.
19 वर्षीय अल्कारेजने सामन्यानंतर आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, 'मी लहानपणापासून या गोष्टीचे स्वप्न पाहत होतो. जगात प्रथम क्रमांकावर राहणे आणि ग्रँडस्लॅम जिंकणे हे माझे लहानपणापासूनचे स्वप्न होते. हे माझ्यासाठी खूप खास आहे. यासाठी मी माझी टीम आणि कुटुंबासह खूप मेहनत घेतली आहे. माझ्या कठीण निर्णयात माझं कुटुंब आणि माझी टीम कायम माझ्या सोबत होती.'
The call heard round the 🌍
— US Open Tennis (@usopen) September 12, 2022
How it sounded on US Open Radio when @carlosalcaraz won the #USOpen pic.twitter.com/aOB7c5fMqX
जगातील सर्वात तरुण नंबर 1 चा खेळाडू
अल्कारेज याने युएस ओपन जिंकत असोसिएशन ऑफ टेनिस प्रोफेशनल्स क्रमवारीत 6740 गुणांसह पहिला क्रमांक पटकावला आहे. विशेष म्हणजे एटीपी रँकिंगच्या 39 वर्षांच्या इतिहासात, कार्लोस जगातील नंबर-1 बनणारा सर्वात तरुण खेळाडू झाला आहे. त्याने लेटन हेविटचा विक्रम मोडला. हेविटने 2001 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक पटकावला होता. पण कार्लोसने 19 वर्षाचा असतानाच हा खिताब मिळवला आहे. या यादीत कॅस्पर रुड 5850 गुणांसह दुसऱ्या तर राफेल नदाल 5810 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. याशिवाय अल्कारेजने हा विजय मिळवल्यान मागील 17 वर्षात ग्रँड स्लॅम जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. तसंच यूएस ओपनमध्ये गेल्या 32 वर्षात ट्रॉफी जिंकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे.हे देखील वाचा-