T20 World Cup 2022 : भारतासाठी आनंदाची बातमी, बुमराह पुनरागमन करणार, लवकरच होणार वर्ल्डकपसाठी संघाची घोषणा
T20 World Cup : आयसीसी टी20 विश्वचषक 2022 16 ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया येथे पार पडणार आहे. यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होईल अशी माहिती समोर येत आहे.
BCCI to Announce Team India for T20 World Cup 2022 : आयसीसी टी20 2022 विश्वचषक स्पर्धा (ICC T20 World Cup 2022) 16 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलिया येथे पार पडणार आहे. दरम्यान आगामी विश्वचषकासाठी सर्व संघांनी तयारी सुरु केली असून काही देशांनी आपले संघही जाहीर केले आहेत. दरम्यान बीसीसीआयकडून भारती संघाची घोषणा लवकरच केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
याचदरम्यान भारतीय चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) दुखापतीमुळे आशिया कप खेळू शकला नाही. पण आता तो देखील दुखापतीतून सावरत लवकरच संघात पुनरागमन करणार आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या संघातही तो असणार अशी माहिती समोर येत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार आज किंवा येत्या दोन दोन दिवसांत म्हणजेच 15 सप्टेंबरपर्यंत टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
कशी असू शकते टीम इंडिया?
भारतीय संघाचा विचार करता रवींद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाल्यामुळे संघाला मोठा तोटा होण्याची शक्यता आहे. पण त्याची जागा अक्षर पटेल सांभाळू शकतो. त्याशिवाय बुमराहसह हर्षल पटेलही दुखापतीतून सावरल्यामुळे तो संघात पुनरागमन करेल अशी शक्यता आहे. अर्शदीपलाही एक लेफ्ट हँड पेसर म्हणून विचार केला जाऊ शकतो. तर नेमकी टीम इंडिया कशी असू शकते ते पाहूया...
टी20 विश्वचषकासाठी संभाव्य भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पांड्या, रवीचंद्रन आश्विन, दीपक हुडा, दिनेश कार्तिक, जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल.
आता लक्ष्य टी20 विश्वचषक
भारतीय संघ आशिया कप 2022 मध्ये खास कामगिरी करु शकला नाही. आशिया कपमधील भारताची सुरुवात चांगली झाली होती. त्यांनी ग्रुप स्टेजमधील दोन्ही सामने जिंकत सर्वात आधी सुपर 4 मध्ये स्थान मिळवले. पण सुपर 4 मध्ये पाकिस्तान आणि श्रीलंकेकडून भारताला पराभव स्वीकारावा लागला. यामुळे भारत स्पर्धेतून बाहेर पडला. भारताने अखेरच्या सामन्यात अफगाणिस्तानवर मोठा विजय मिळवला. दरम्यान आता मात्र टीम इंडिया 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपसाठी सज्ज झाली आहे. याआधी भारच ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. या दोन्ही मालिकेत भारत विविध खेळाडूंना संधी देऊन विश्वचषकाची तयारी करेल.
टी-20 विश्वचषक 2022 साठी16 संघ पात्र
आगामी टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, भारत, नामिबिया, न्यूझीलंड, पाकिस्तान, स्कॉटलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका , वेस्ट इंडिज, आयर्लंड आणि यूएईनं आधीच आपलं स्थान निश्चित केलं होतं. त्यानंतर आता नेदरलँड्स आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांनी क्वालिफायर टूर्नामेंटच्या अंतिम फेरीत पोहोचून टी-20 विश्वचषकात 2022 मध्ये आपली जागा पक्की केलीय.
हे देखील वाचा-