SRH vs RR IPL 2025: स्टार्कच्या इंजिनामुळे राजधानी जोरात

SRH vs RR IPL 2025: काल विशाखापट्टणम इथे दिल्ली विरुद्ध एसआरएच या सामन्यात स्टार्कच्या पंचकामुळे दिल्ली संघाची विजयी घोड दौड कायम राहिली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा हैदराबाद संघाचा निर्णय स्टार्कच्या भेदक गोलंदाजीमुळे अंगलट आला. विप्रज निगमच्या अचूक थ्रो मुळे आज सुद्धा अभिषेक शर्मा अपयशी ठरला...आणि त्यानंतर हैदराबाद संघावर स्टार्क नावाचे वादळ धडकले. उजव्या यष्टि बाहेर असलेल्या चेंडू पॉईंट सीमारेषे बाहेर भिरकवण्याच्या प्रयत्नात ईशान किशन डीप पॉईंट ला झेल बाद झाला. त्यानंतर आलेला नितीश ने आत्मघातकी फटका खेळून स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली...या पडझडीत हैदराबाद संघाकडून अनिकेत वर्मा या खेळाडूने एक धाडसी खेळी खेळली....दरवर्षी प्रमाणे ही आय पी एल सुद्धा काही नव्या स्टार्सना जन्म देत आहे... कधी मुंबईकडून खेळणारा विघ्नेश तर कधी अनिकेत ..तर कधी झिशान अन्सारी...आणि हे या स्पर्धेचे मोठे यश आहे. अनिकेत ने क्लासन समोर असताना सुद्धा आपली छाप पाडली ...यात त्याने काही उत्तम फटके खेळले त्यात त्याचे ६ षटकार होते आज त्याने सर्धेतील आपल्या पहिल्या अर्धशतकाला गवसणी घातली. मात्र क्लासन बाद झाल्यावर कुलदीप आणि स्टार्क ने हैदराबादचे शेपूट वळवळणार नाही याची दक्षता घेतली...आणि १६३ या माफक धावसंखेवर त्यांना रोखून धरले.
१६३ धावांचा बचाव करण्यासाठी हैदराबाद संघाला लागणार होते ते उत्तम क्षेत्ररक्षण...आणि याच बाबतीत हैदराबाद संघ कमी पडला. दिल्लीच्या सलामवीरांचे काही सोपे झेल सोडून त्यांनी दिल्ली संघाचा विजय सुकर केला... फ्रेसर आणि डुप्लिसी यांनी ८१ धावांची सलामी देऊन आक्रमक सुरुवात केली.. झिशान अन्सारी च्या चेंडूवर बाद होईपर्यंत तो अर्धशतक मारून मोकळा झाला होता आणि उरलेले काम फ्रेझर आणि इतर फलंदाजांनी पूर्ण करून दिल्ली संघाला गुणतालिकेत वरचे स्थान मिळवून दिले. हैदराबाद संघाच्या या पराभवात सुद्धा झिशान अन्सारी हा लेग स्पिनर चमकून गेला. हा तरुण लेग स्पिनर इतर लेग स्पिनर सारखा फक्त गुगली या अस्त्रावर भरोसा न ठेवता स्वतःच्या लेग ब्रेकवर पण तितकाच भरोसा ठेवतो ही जमेची बाब आहे. राहुल ला त्यांनी टाकलेला चेंडू पारंपारिक लेग स्पिनर ची आठवण देऊन गेला. झीशान अन्सारीला जर उत्तम मार्गदर्शन मिळाले तर भविष्यात तो एक चांगला लेग स्पिनर होऊ शकतो हे नक्की.. हैदराबाद संघ तेव्हाच उत्तम कामगिरी करतो जेव्हा त्यांचे दोन्ही सलाम वीर उत्तम फॉर्म मध्ये असतात. आता प्रतीक्षा अभिषेक शर्माची...

























