IPL 2025 RR vs CSK: राणाचे वादळ, राजस्थानची ओपनिंग

IPL 2025 RR vs CSK: आज गोहाटी इथे झालेल्या चेन्नई विरुद्धच्या सामन्यात राजस्थान संघाने गुणतालिकेत आपले खाते उघडले...या आधी हैदराबाद आणि कलकत्ता या दोन्ही संघांकडून पराभूत झाल्यावर या वर्षी या तरुण संघावर त्यांच्या गुणवत्तेवर शंका घेतल्या जाऊ लागल्या..पण आज विजय मिळवून त्यांनी काही वेळ तरी आपल्या टीकाकारांची तोंड बंद केलीत... बरं ही टीका राजस्थान संघावर कमी आणि कर्णधार रियान पराग वर अधिक असे...आज झालेल्या सामन्यात नाणेफेक हरल्यावर राजस्थान ने पहिली फलंदाजी केली...आज नितीश राणा ने उत्तम फलंदाजी केली...खासकरून त्याने अश्विन च्या गोलंदाजीवर चढविलेला हल्ला...त्याच्या पहिल्याच षटकात त्याने स्वीप चे दोन षटकार मारून आपले इरादे स्पष्ट केले होते...नितीश राणा याने याआधी कलकत्त्या कडून काही सिझन गाजवलेले आहेत...आणि भारतीय खेळपट्टीवर तो उत्तम फलंदाजी करतो...आज त्याने अश्विन ला चांगले रिड केले आणि त्याच्याच गोलंदाजीवर त्याने भरपूर धावा केल्या..३६ चेंडूत ८१ धावा यावरून त्याच्या खेळीचा परिणाम दिसून येतो.
आज कर्णधार रियान ने सुद्धा छोटी आणि महत्वपूर्ण खेळी केली...पण हे दोघे बाद झाल्यावर राजस्थान संघ २०० पार करणार नाहीत याची चेन्नई च्या गोलंदाजांनी खबरदारी घेतली...त्यात नूर आणि पथ्थी राणा यांचा वाटा अधिक होता.. १८३ धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या राजस्थान संघाला त्याचा बचाव करण्यासाठी चांगल्या क्षेत्ररक्षणाची मदत हवी होती...आणि ती राजस्थानच्या खेळाडूंनी दिली... रचिन स्वस्तात बाद झाल्यावर चेन्नई अडचणीत येणार हे उघड होते...त्रिपाठी चा डीप मिडविकेटवर हेटमायार ने घेतलेला उत्तम झेल तसाच झेल त्यांनी शेवटी धोनी चा देखील घेतला...पण धोकदाद्यक वाटणाऱ्या शिवम चा झेल कव्हर मधे स्वतः कर्णधार रियान ने अप्रतिम घेतला...जमिनीलगत असलेल्या हा झेल इतका अप्रतिम होता की तो जॉनटी रोड ने देखील मिरवला असता....आणि याच झेलाने सामन्याचे चित्र पालटले. रुतुराज आज देखणी खेळी खेळला...पण पुन्हा एकदा पावर प्ले मध्ये फायदा घेण्याचे फलंदाज अपयशी ठरले.. आणि सोळाव्या षटकापर्यंत त्यांची सरासरी पुन्हा एकदा 15 च्या आसपास गेली...शेवटी जडेजा आणि धोनी ने प्रतिकार केला पण तो अपुरा पडला..आज हसरंगाने त्याच्या गोलंदाजीतले रंग दाखविले...या फॉर्मेट मधील जागतिक पातळीवर तो एक उत्तम गोलंदाज आहे..त्याने आपल्या अचूक फिरकीच्या जाळ्यात चेन्नई ला ओढले आणि त्याला राजस्थानच्या क्षेत्ररक्षकांनी उत्तम साथ दिली..आजच्या सामन्यात विशेष कौतुक करावे लागेल ते रियान पराग चे कारण कर्णधार म्हणून तो तिन्ही पातळ्यांवर आघाडीवर लढला...त्याने उत्तम फलंदाजी केली... उत्तम क्षेत्ररक्षण केले... आणि संपूर्ण सामन्यात त्याने उत्तम नेतृत्व केले..जोफ्रा असताना त्याने धोनी समोर शेवटचे षटक संदीप ला दिले..यावरून त्याला गेम अवेअरनेस आहे हे माहित झाले. आयपीएल मधील कर्णधार पद हा काटेरी मुकुट असतो...कॉर्पोरेट जगात राजे असणारे लोक इथे तुमचे मालक असतात..अप्रिसिएट इन द पीपल अँड रिप्रीमांड इन प्रायव्हेट असे फक्त ते मीटिंग मध्ये बोलतात ...पण त्यांना त्यांच्या संघाची हार पचत नसते. रियांन च्या डोक्यावर हा काटेरी मुकुट आहे..आणि तो किती काटेरी आहे हे राहुल ( के एल) ला विचारा. अर्थात रियान आणि त्याचा तरुण संघ दुसऱ्या एका राहुलच्या हातात आहे....आणि ते काटे बोचणार नाहीत याची खबरदारी ते घेतील..





















