Maharashtra LIVE: राज्यभरात रमजान ईदचा उत्साह, गुढीपाडव्याला वाहन खरेदीला ऊत; राज्यभरातील आकडेवारी आली समोर
Maharashtra Live Blog in Marathi: राज्यातील ताज्या घडामोडी, घटना आणि बातम्यांचे लाईव्ह अपडेटस् पाहण्यासाठी क्लिक करा. राज्यात नेमकं काय चाललंय जाणून घ्या एका क्लिकवर.

Background
Maharashtra Live Updates: कुणाल कामरा आज मुंबई पोलिसांसमोर चौकशीला हजर राहण्याची शक्यता आहे. मद्रास हायकोर्टाने कुणाला कामरा याला अटकपूर्व जामीन मंजूर केला होता. कुणाल कामरा मुंबईत आल्यास काय प्रतिक्रिया उमटणार? राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणावर राजकीय वर्तुळात काय प्रतिक्रिया उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आज राज्यभरात रमजान ईदचा उत्साह बघायला मिळत आहे.
धनंजय देशमुख बाईट ऑन कळंब येथील महिलेचा मृत्यू
बाईट पॉईंटर
मी वेळोवेळी सांगत आलो आहे केज स्टेशन मध्ये पहिल्या आठ दिवसाचा तपासाचे री इन्वेस्टीगेशन करावे
त्याच्यातलाच हा एक भाग आहे हत्या केल्यानंतर चुकीच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी एक महिला तयार केली गेली होती. ही आरोपीने तयार केलेली महिला होती
त्याच्या अगोदर या गोष्टीमुळे कित्येक जण बळी पडले असतील मात्र पोलिसांनी त्याला गांभीर्याने घेतलं नाही
त्या महिलेचा कुणीतरी खून केल्याची बातमी आली आहे आणि याला कारणीभूत कोण आहे आता याची जबाबदारी कोण घेईल
याचा कुठलाही तपास पोलिसांनी केला नाही
दत्तात्रय भरणे यांना पडला अजितदादांच्या नावाचा विसर म्हणाले...
पुणे जिल्हा राजकीय दृष्ट्या खूप दिग्गजांचा जिल्हा असला तरी मला मिळालेली मोठी पदे ना पवार घराण्याला मिळाली ना मोहोळ घराण्याला ना देशमुख घराण्याला ना पाटील घराण्याला .. आई-वडिलांची कृपा आणि परमेश्वराचा आशीर्वाद यामुळे या सर्व मोठ्या पदांवर मला बसता आल्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले. मात्र ही सर्व पदे मिळविताना अजित दादा यांचे श्रेय मात्र सांगण्यास भरणे विसरले. पुणे जिल्ह्यात अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात अजित पवार यांनी नेहमीच दत्तात्रय भरणे यांना ताकद देत मोठे करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या निवडणुकीत भरणे यांचा पराभव झाल्यानंतर दादांनी त्यांना पुणे जिल्हा परिषद आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष करीत मोठी ताकद दिली आणि यानंतर भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा इंदापुरातून पराभव करून विधानसभेत प्रवेश केला. हे सर्व पदे देताना अजितदादांनी पुणे जिल्ह्यातील इंदापूर विधानसभा जिंकण्यासाठी भरणे यांना ताकद दिली होती.
आज मात्र आपल्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना दत्तात्रय भरणे यांनी पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी पद पवारांना मिळाली नाहीत ती आपल्याला मिळाल्याचे सांगितले. हे सर्व आई-वडील सुलतान चुलती आणि परमेश्वराच्या आशीर्वादाने झाल्याचे सांगताना भरणे यांना अजितदादांच्या नावाचा विसर पडला.
पुणे जिल्ह्याला राजकीय दृष्ट्या खूप मोठे महत्त्व आहे. जिल्ह्यात खूप मोठी राजकीय मंडळी कार्यरत आहेत. मात्र सुदैवाने मला पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठ्या सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन, पुणे जिल्हा बँकेचा चेअरमन, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ही तिन्ही सर्वात मोठी पदे मला मिळू शकली. यानंतर लगेच आमदार व राज्यमंत्री बनलो आणि आता कॅबिनेट मंत्री पदावर काम करण्याची संधी मिळाली.
पुणे जिल्ह्यात मगर, मोहोळ, पाटील, पवार , देशमुख अशी मोठमोठी राजकीय घराणी असताना जिल्ह्यातील सर्वात मोठी पदे भूषवण्याचा मान आपल्याला मिळाला असल्याचे मोठे विधान राज्याचे क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय. आपण या पदांचा उपयोग सामान्य जनतेच्या कामासाठी केल्याची भरणे यांनी यावेळी सांगितले. जोडली. पंढरपूर पंचायत समितीचे माजी सभापती वामनराव माने यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते.























