एक्स्प्लोर

Neeraj Grover Case: प्रसिद्ध अभिनेत्रीनं होणाऱ्या नवऱ्यासोबत रचला प्रियकराच्या हत्येचा कट; मृतदेहासमोरच दोघांचा सेXX, 300 तुकडे करुन फेकले

Neeraj Grover Case: अलिकडेच मुस्कान रस्तोगी, समीर शुक्ला आणि सौरभ राजपूत यांच्या प्रकरणाने देशभरात खळबळ उडाली. मुस्काननं तिचा प्रियकर समीर शुक्लासह मिळून तिचा पती सौरभ राजपूतची हत्या केली होती.

Neeraj Grover Case: फिल्म इंडस्ट्री (Film Industry) किंवा टेलिव्हिजन इंडस्ट्री (Television Industry), सर्वांना फक्त ग्लॅमर आणि चमचमती दुनिया दिसते. पण, याच इंडस्ट्रीची दुसरी बाजू अत्यंत गुरफटलेली, तितकीच खोल आहे. या ग्लॅमर जगतात अनेक स्टार्स झाले आहेत, ज्यांनी त्यांच्या कारकिर्दीत मोठी उंची गाठली आहे. पण, काही असेही स्टार्स आहे, ज्यांना या ग्लॅमरस जगताची भूरळ पडली आणि त्यांना याचीच कठोर शिक्षा भोगावी लागली. याचंच उत्तम उदाहरण आहे, 2008 मध्ये घडलेली एक धक्कादायक, खळबळजनक घटना. या घटनेला तुम्ही जेवढी विशेषणं लावाल, तेवढी कमीच आहेत. या घटनेनं कौर्याची परिसिमा ओलांडली होती. अख्ख जग हादरवणारं प्रकरण म्हणजे, 2008 मधली प्रसिद्ध टेलिव्हिजन निर्माते नीरज ग्रोव्हर (Neeraj Grover) यांची हत्या. बेपत्ता नीरज ग्रोव्हर यांच्या मृतदेहाचे 300 तुकडे सापडले आणि अख्ख जग हादरलं. 

सध्या देशात चर्चा रंगली आहे, मुस्कान रस्तोगी (Muskan Rastogi), समीर शुक्ला (Sameer Shukla) आणि सौरभ राजपूत (Saurabh Rajput) यांची. मुस्काननं तिचा प्रियकर समीर शुक्लासोबत कट रचला आणि आपला नवरा सौरभ राजपूतला थेट यमसदनी धाडलं. पण, अशीच एक घटना 2008 मध्ये घडली होती. ज्यामुळे टेलिव्हिजन इंडस्ट्रीत खळबळ माजली होती. 26 वर्षीय अभिनेत्री क्रूर घटनेची गुन्हेगार होती. मे 2008 मध्ये प्रसिद्ध टेलिव्हिजन निर्माते नीरज ग्रोव्हर यांची हत्या केली. कन्नड अभिनेत्री मारिया सुसाईराज आणि तिचा होणारा नवरा लेफ्टनंट एमिल जेरोम मॅथ्यू यांना नीरज ग्रोव्हरच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेली. 

नीरज ग्रोव्हर उत्तर प्रदेशचा रहिवाशी

नीरज ग्रोव्हर हा मुंबईस्थित प्रॉडक्शन हाऊस सिनर्जी अॅडलॅब्समध्ये काम करणारा टेलिव्हिजन एक्झिक्युटिव्ह होता. तो उत्तर प्रदेशातील किष्णी या छोट्या गावातून करिअर घडवण्यासाठी तो मुंबईत आलेला.  शाहरुख खानचा 'क्या आप पांचवी पास से तेज हैं?' या शोमध्ये क्रिएटिव्ह एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहिलेलं. तसेच, तो महाभारताच्या ऑडिशनचाही भाग होता. नीरजची कन्नड अभिनेत्री मारिया सुसाईराजशी भेट झाली आणि तो तिच्या प्रेमात पडला. दोघांचे प्रेम खुललं, बहरलं पण अखेर याच प्रेमानं नीरज ग्रोव्हरचा बळी घेतला. 

नेमकं काय घडलेलं? 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नीरज ग्रोव्हर मारियाला तिच्या मुंबईतल्या नव्या अपार्टमेंटमध्ये शिफ्टिंग करण्याच्या मदतीसाठी गेला होता. पण, त्यानंतर तो पुन्हा कधीच दिसला नाही. मारियाचं लग्न कोचीनमध्ये तैनात असलेल्या नौदल अधिकाऱ्याच्या एमिल जेरोम मॅथ्यूशी झालं होतं. त्याला मारिया आणि नीरजच्या अफेअरबद्दल शंका आली. त्यानंतर तो खूप पझेसिव्ह होऊ लागला. 

6 मे 2008 च्या रात्री, नीरज मारियाच्या अपार्टमेंटमध्ये होता आणि अभिनेत्रीला तिच्या घराच्या शिफ्टिंगसाठी मदत करत होता. मॅथ्यूनं मारियाला फोन केला, त्याचवेळी नीरज मारियासोबत असल्याचं त्याला कळालं. मॅथ्यूनं त्याला तिथून निघून जाण्यास सांगितलं, पण नीरज रात्रभर तिथेच राहणार असल्याचं त्याला समजलं, ज्यामुळे मॅथ्यू नाराज झाला. 

7 मे 2008 रोजी सकाळी 7 वाजताच्या सुमारास, मारियाच्या दाराची बेल वाजली. मारियानं दार उघडलं, त्यानंतर मॅथ्यू समोर उभा असल्याचं पाहून तिला धक्काच बसला. नीरज आधीपासूनच घरात होता, त्यावेळी नीरज आणि मारिया दोघांमध्ये जोरदार वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि रागाच्या भरात मॅथ्यूनं स्वयंपाकघरातील चाकू उचलला आणि नीरजवर हल्ला केला. मॅथ्यूनं केलेल्या हल्ल्यात नीरजचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मारिया आणि मॅथ्यू दोघेही हादरले. काय करावं दोघांनाही कळेना. 

नीरजचा खून केल्यानंतर दोघांनी सर्वात आधी घर स्वच्छ केलं. त्यानंतर नीरजचा मृतदेहासमोरच एकदा नाहीतर दोनदा शारीरिक संबंध ठेवले. मारिया आणि मॅथ्यू दोघांनीही कौर्याच्या सीमा ओलांडल्या. 

नीरजच्या मृतदेहाचे केले 300 तुकडे 

हत्येनंतर, मारियानं दोन डफेल बॅग, बेडशीट, पडदे आणि एक चाकू खरेदी केला. तिनं मॅथ्यूच्या साथीनं नीरजच्या शरीराचे अनेक तुकडे केले आणि ते वेगवेगळ्या पिशव्यांमध्ये भरले. कोणताही पुरावा मागे राहू नये, म्हणून दोघांनी मिळून अपार्टमेंट स्वच्छ केलं. त्यानंतर, मारियानं शेजाऱ्याची गाडी घेतली आणि त्याच दिवशी दुपारी 4:30 वाजता मुंबईहून निघाले. सर्वात आधी त्यांनी पेट्रोल विकत घेतलं. त्यानतर तुकडे-तुकडे केलेलं नीरजचं शव जाळण्याचा प्रयत्न केला. 

पोलिसांनी या प्रकरणाचा माग काढला. मारियानं गन्ह्याची कबुली दिली आणि त्यानंतर पोलिसांनी तिला अटक केली. मारियाला तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. मॅथ्यूला त्याच्या कबुलीजबाबाच्या आधारे दोषी ठरवण्यात आलं. त्यानंतर त्याला 10 वर्षांची आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी 3 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

"स्वतःच्या आया, बहिणींचे व्हिडीओ जाऊन बघा, त्यांचंही शरीर माझ्यासारखंच..."; कास्टिंग काऊचचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीचा संताप

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
Raja Shivaji Box Office Collection: बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या आठड्यातही 'राजा शिवाजी'चा डंका, 100 कोटींच्या कमाईपासून किती पावलं दूर ?
बॉक्स ऑफिसवर तिसऱ्या आठड्यातही 'राजा शिवाजी'चा डंका, 100 कोटींच्या कमाईपासून किती पावलं दूर ?
Pune Marathi Film Festival: मराठी सिने चाहत्यांसाठी गुडन्यूज! पुण्यात 3 दिवस रंगणार मराठी फिल्म फेस्टिव्हल, दिग्गज कलाकारांसह क्लासिक चित्रपटांची मेजवानी
मराठी सिने चाहत्यांसाठी गुडन्यूज! पुण्यात 3 दिवस रंगणार मराठी फिल्म फेस्टिव्हल, दिग्गज कलाकारांसह क्लासिक चित्रपटांची मेजवानी
Shehnaaz Gill Affair Roumers with RCB Player: शहनाझ गिलच्या अफेअरची चर्चा, विराट कोहलीच्या RCB मधील 'त्या' खेळाडूला करतेय डेट
शहनाझ गिलच्या अफेअरची चर्चा, विराट कोहलीच्या RCB मधील 'त्या' खेळाडूला करतेय डेट

व्हिडीओ

Special Report Pimpri Chinchwad Teddy bear case : टेडी की बॉम्ब, प्रियकराचा गिफ्टनं सुटला घाम
Special Report Mumbai Goa Highway Toll Naka : मुंबई-गोवा महामार्ग अजून अपूर्णच, पण टोलवसुलीही सुरू
Coffee with Kaushik : Rohit Pawar : बारामतीचा पुढचा दादा कोण? तटकरे-पटेलांचा 'तो' ऑडिओ कोणता?
Dhananjay Munde Speech : मी जात-पात-धर्म सोडून राजकारण केलं, पण मला लाथा मारून हाकलायचा प्रयत्न झाला
Manoj Jarange On Maratha Reservation : २९ तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करा, नाहीतर ३० मे रोजी टेकायचं म्हणजे टेकायचं: जरांगे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohini Khadse : अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाला पोलिसांची व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहिणी खडसेंचा खळबळजनक आरोप, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनाही सुनावलं
अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत गैरकृत्य, आरोपी शिक्षकाला पोलिसांची व्हिआयपी ट्रिटमेंट; रोहिणी खडसे यांचा खळबळजनक आरोप, पालकमंत्री गुलाबराव पाटलांनाही सुनावलं
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
IPL 2026 Playoffs: आयपीएलमध्ये कोणते चार संघ क्वालिफाय होणार? कोणाचे किती पॉईंट, काय आहे समीकरण?
Mumbai Crime news: मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
मोठी बातमी: मुंबईतील काँग्रेस नगरसेविकेच्या मुली आणि जावयांवर गुन्हा दाखल, अनैतिक संबधांच्या संशयावरुन महिलेचे अपहरण, संपूर्ण कुटुंबावर गुन्हा दाखल
Rohit Pawar: दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
दोन बड्या नेत्यांनी अजितदादांबाबत खालच्या दर्जाची भाषा वापरली, सुनेत्रा पवार अन् पार्थ पवारांनी 'ती' ऑडिओ क्लीप ऐकलेय: रोहित पवार
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
अंग थंड पडलं, इंजेक्शन आणण्यास काही सेकंदांचा उशीर अन्..‘शोले’ फेम अमजद खान यांच्या मृत्यूच्या रात्री काय घडलेलं?
CBSE :  सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार, दोन भारतीय भाषा अनिवार्य
सीबीएसईचा त्रिभाषा सूत्रासंदर्भात मोठा निर्णय, नववीपासून विद्यार्थ्यांना तीन भाषा शिकाव्या लागणार
Maharashtra Live blog updates: गोकूळ दूधाच्या किंमतीत वाढ, 21 मे पासून नवे दर लागू होणार
Maharashtra Live blog updates: गोकूळ दूधाच्या किंमतीत वाढ, 21 मे पासून नवे दर लागू होणार
PM Modi Speech : स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
स्थिती सुधारली नाही तर सगंळं काही संपेल, ऊर्जा संकटावर पंतप्रधान मोदींचा इशारा
Embed widget