Devendra Fadnavis: राज ठाकरेंनी महत्त्वाचे मुद्दे मांडले, निश्चित विचार करु; देवेंद्र फडणवीस मताशी सहमत
Devendra Fadnavis on Raj Thackeray : शेवटी राज्य चालवत असताना सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे आमचे उदिष्ट असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

Devendra Fadnavis on Raj Thackeray : निश्चितपणे राज्य चांगल्या पद्धतीने चालवण्याचे आमचा प्रयत्न आहे. शिवाय राज्य चांगल्या पद्धतीने चालवत असताना सर्वांची मदत घेऊन, सर्वांना विश्वासात घेऊनच राज्य पुढं नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचे संपूर्ण भाषण मी ऐकू शकलो नाही. मात्र जेवढं मी ऐकलं त्यात ते काही महत्त्वपूर्ण मुद्दे बोलले आहेत. निश्चितच आम्ही त्यावर विचार करू. शेवटी राज्य चालवत असताना सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचे आमचे उदिष्ट असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे.
महाराष्ट्राचे प्रश्न सोडवणार असतील मराठी माणसाच्या चांगल्यासाठी काम करणार असतील तर फडणवीसंना पाठिंबा असेल असं राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यातून जाहीर केलं होतं. दरम्यान राज ठाकरेंच्या या आवाहनाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी एकप्रकारे टाळी देत, मनसे प्रमुखांच्या (Maharashtra Navnirman Sena) मुद्द्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मुख्यमंत्री फडणवीस हे नागपूर येथे बोलत होते. यावेळी त्यांनी विविध मुद्यावर भाष्य केलंय.
वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही- मुख्यमंत्री
मोदीजींचं उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण नाही. ते अजून बरेच वर्ष काम करणार आहेत. आमचा सगळ्यांचा आग्रह आहे की 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडे बघतो आहोत. त्यामुळे आता अशी चर्चा करणे योग्य होणार नाही. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारतीय संस्कृतीत वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही. ही सगळी मोगली संस्कृती आहे. वडील जिवंत असताना मुलं असा विचार करतात. त्यामुळे आता कोणाचाही उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली नाही. जोपर्यंत माझा विषय आहे माझा त्याच्याशी संबंध नाही. असेही ते म्हणाले.
हा खूप मोठा, थोडा वेळ खाणारा आणि खर्चिक कार्यक्रम, पण....
महाराष्ट्रातील नद्या निर्मळ झाल्या पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. त्याकरिता काही मिशन आम्ही हातात घेतले आहे. हे तात्काळ स्वरूपात होणारी कामे नाही. हा खूप मोठा कार्यक्रम आहे. थोडा वेळ खाणारा आणि खर्चिक कार्यक्रम आहे. मात्र हा केलाच गेला पाहिजे या मताचे आम्ही असल्यामुळे त्याची सुरुवात आम्ही केली आहे. यावेळी आपला कुंभमेळावा होईल. त्यावेळी पवित्र गोदावरी नदीत लोक स्नान करतील त्यावेळी त्यांना स्वच्छ पाण्याचा अनुभव कसा देता येईल हा आमचा प्रयत्न राहील. असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज ठाकरेंनी आपल्या भाषणातून महाराष्ट्रातील नद्यांवर भाष्य करत सरकारवर चांगलेच ताशेरे ओढले होते . कुंभमेळ्यातील गंगेच्या स्थितीपासून राज्यातील 55 नदीपट्टे प्रदूषित असल्याचं सांगत मुंबईत 4 नद्या 'वारल्या' नव्हे मारल्या. एक मिठी नदी मरणासन्न अवस्थेत आहे. असं म्हणत राज ठाकरेंनी नद्यांवर बोललो की धर्म आडवा येणार ? असा संतप्त सवाल केला होता. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे.
पाहा व्हिडीओ :
हे ही वाचा























