L2 Empuraan Box Office Collection: फक्त दोनच दिवसांत 100 कोटी पार; विक्कीचा 'छावा', शाहरुखच्या 'जवान'चे सारे रेकॉर्ड चक्काचूर, चित्रपट कोणता माहितीय?
L2 Empuraan Box Office Collection: दक्षिणेतील अभिनेते मोहनलाल यांच्या 'एल2 एम्पूरन' या चित्रपटानं अवघ्या दोन दिवसांत जगभरात 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

L2 Empuraan Box Office Collection: दाक्षिणात्य सुपरस्टार (South Superstar) मोहनलालचा (Mohanlal) 'एल2 एम्पूरन' (L2 Empuraan) बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) चांगली कामगिरी करत आहे. पहिल्या दिवशी जगभरात 65 कोटी रुपये कमावणाऱ्या 'एल2 एम्पूरन'नं दुसऱ्या दिवशी जगभरात 100 कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. पहिल्याच दिवशी चित्रपटानं मोठी कमाई करून अनेक धमाकेदार विक्रम प्रस्थापित केले होते. दुसऱ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर 'एल2 एम्पूरन'नं आपली पकड कायम ठेवली.
मोहनलालचा 'एल2 एम्पुरान' हा चित्रपट अभिनेता आणि दिग्दर्शक पृथ्वीराज सुकुमारन यांनी दिग्दर्शित केला आहे. मोहनलाल आणि पृथ्वीराज यांच्या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी जगभरात 35 कोटींपेक्षा जास्त कमाई केली. या चित्रपटानं यूकेमध्ये चांगली कमाई केली आणि शाहरुख खानच्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'जवान'ला जोरदार टक्कर दिली आणि आता शुक्रवारी 'जवान'सह यूकेमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर शाहरुखचा आणखी एक चित्रपट 'पठान' आहे.
View this post on Instagram
'एल2 एम्पुरान'नं दिली 'जवान'ला टक्कर
मोहनलालचा 'L2 Empouran' हा चित्रपट गुरुवार, 27 मार्च रोजी प्रदर्शित झाला. त्यानं पहिल्या दिवशी यूकेमध्ये £628K (6,95,28,392 रुपये) कमाई केली आणि पहिल्या दिवशी यूकेमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला. दुसऱ्या दिवशी मात्र, 'L2 Empouran'च्या कमाईत घट झाली. शुक्रवारी यूकेमध्ये L2 Empuran नं £315K (3,48,74,910 रुपये) कमावले. आणि हा चित्रपट जवानसह या बाबतीत दुसऱ्या स्थानावर आहे. पहिल्या क्रमांकावर शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा 2023 मध्ये प्रदर्शित झालेला 'पठान' चित्रपट आहे.
दोन दिवसांत 100 कोटींचा गल्ला
27 मार्च रोजी जगभरात प्रदर्शित झालेल्या मोहनलाल आणि पृथ्वीराज चित्रपटाचं बजेट 180 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. दोन दिवसांत 100 कोटी रुपये कमावून हा चित्रपट त्याच्या बजेटच्या अगदी जवळ पोहोचला आहे. पहिल्या दिवशी भारतात चित्रपटाचं कलेक्शन सुमारे 21 कोटी रुपये होतं. आणि तो भारतातील सर्वात मोठा ओपनर मल्याळम चित्रपटही बनला. तर परदेशात पहिल्या दिवशी सुमारे 44 कोटी रुपये कमावले होते. त्यानुसार, त्यानं जगभरातील पहिल्या दिवशी 65 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली.
दरम्यान, शुक्रवारी थिएटरमध्ये रिलीज झालेल्या 'L2 Empouran'नं फक्त दोनच दिवसांत वर्ल्डवाईल्ड 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. दुसऱ्या दिवसाचं त्याचं कलेक्शन 35 कोटींपेक्षा जास्त झालं. अभिनेता मोहनलालनं इन्स्टाग्राम अकाउंटवरुन पोस्ट शेअर करुन यासंदर्भात माहिती दिली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























